Join us  

Asia Cup 2022, IND vs PAK : भारताच्या गोलंदाजाची प्रकृती बिघडली, Rahul Dravid ने माहिती दिली! टीम इंडियाची चिंता वाढली 

Asia Cup 2022 SUPER-4 India vs Pakistan : पाकिस्तान संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेत हाँगकाँगवर विजय सुपर ४ मधील आपले स्थान पक्के केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 9:03 PM

Open in App

Asia Cup 2022 SUPER-4 India vs Pakistan : पाकिस्तान संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेत हाँगकाँगवर विजय सुपर ४ मधील आपले स्थान पक्के केले. श्रीलंकेने गुरुवारी बांगलादेशवर थरारक विजय मिळवून सुपर ४ मध्ये एन्ट्री मारली होती. पाकिस्तान Super 4 मध्ये जागा मिळवणारा चौथा संघ ठरला. पाकिस्तानच्या आजच्या विजयाने पुन्हा India vs Pakistan यांचा महा मुकाबला सेट झाला. येत्या रविवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुन्हा पाकिस्तानला भिडणार आहे. पण, दोन्ही संघांना दुखापतीचा सामना करावा लागला आहे. भारताच्या रवींद्र जडेजाने, तर पाकिस्तानच्या  शाहनवाज दहानीने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यात टीम इंडियाचा आणखी एक गोलंदाज आजारी पडल्याची माहिती मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यांनी दिली. 

भारताने आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला होता. हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरी करताना विजयी षटकार खेचला होता. त्याने त्या सामन्यात ३ विकेट्स व नाबाद ३३ धावा केल्या होत्या. भुवनेश्वर कुमारने चार विकेट्स घेतल्य, तर रवींद्र जडेजाने संयमी खेळ करताना भारताचा डाव सावरला होता. पण, आता रवींद्र जडेजाने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे आणि त्याच्याजागी दीपक हुडा किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात विश्रांती घेऊन हार्दिक पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. 

आवेश खान ( Avesh Khan) याला ताप आल्याचे द्रविडने शनिवारी सांगितले. तो पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याचे द्रविडने स्पष्ट केले. पण  त्यानंतरच्या सामन्यासाठी तो फिट ठरेल अशी आशा त्याने व्यक्त केली.  आवेशने आज सराव सत्रातही सहभाग घेतला नाही. त्याने दोन सामन्यांत ७२ धावा देताना दोन विकेट्स घेतल्या. हाँगकाँगच्या फलंदाजांनी त्याच्या ४ षटकांत ५३ धावा कुटल्या होत्या.  द्रविडने यावेळी विराट कोहलीच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. तो म्हणाला, विश्रांतीनंतर ताजातवाना होऊन परतलेला विराट पाहून आनंद झाला. त्याच्या कामगिरीवर मी समाधानी आहे. त्याने कारकिर्दीत एवढे विक्रम केलेत की त्याच्या लहान खेळीवर लोकं समाधानी होत नाही. पण, तिही संघासाठी महत्त्वाचीच असते.   

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानराहुल द्रविडआवेश खान
Open in App