Asia Cup 2022 IND vs PAK : रोहित शर्माचा पाकिस्तानला इशारा, Virat Kohliचा फॉर्म व प्लेइंग इलेव्हनबाबत केलं मोठं भाष्य, Video 

Asia Cup 2022 IND vs PAK Rohit Sharma PRESS Conference : आशिया चषक स्पर्धेचे आठवे जेतेपद पटकावण्यासाठी टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सज्ज झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 06:27 PM2022-08-27T18:27:12+5:302022-08-27T18:27:32+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2022 IND vs PAK Rohit Sharma PRESS Conference : Rohit Sharma said, Virat Kohli looked in great touch in the nets. He is working extremely hard, We haven't decided the X1, Video  | Asia Cup 2022 IND vs PAK : रोहित शर्माचा पाकिस्तानला इशारा, Virat Kohliचा फॉर्म व प्लेइंग इलेव्हनबाबत केलं मोठं भाष्य, Video 

Asia Cup 2022 IND vs PAK : रोहित शर्माचा पाकिस्तानला इशारा, Virat Kohliचा फॉर्म व प्लेइंग इलेव्हनबाबत केलं मोठं भाष्य, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2022 IND vs PAK Rohit Sharma PRESS Conference : आशिया चषक स्पर्धेचे आठवे जेतेपद पटकावण्यासाठी टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सज्ज झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया चषक स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. त्यात यंदाच्या स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. विराट कोहलीच्या पुनरागमनाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. या सामन्यापूर्वी शनिवारी दोन्ही संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद झाली आणि त्यात रोहित शर्माने ( Rohit Sharma) पाकिस्तानला अप्रत्यक्षित इशारा दिला आहे. 

''ट्वेंटी-२०  वर्ल्ड कपमध्ये काय घडले तो भूतकाळ आहे आणि तो आम्ही बदलू शतक नाही. त्यामुळे उद्याच्या लढतीवर आमचे सर्व लक्ष केंद्रीत आहे. प्रतिस्पर्धीचा जास्त विचार करण्यापेक्षा १०० टक्के देण्यावर आमचा प्रयत्न असेल. पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल याचा निर्णय घेतलेला नाही. श्रीलंका व अफगाणिस्तान यांचा सामना याच मैदानावर होत आहे. हा सामना कसा रंगतो हे आम्हाला पाहयचे आहे आणि त्यावरच आम्ही प्लेइंग इलेव्हनचा निर्णय घेऊ.'' असे रोहितने स्पष्ट केले. संघात चांगले खेळाडू आहेत, परंतु प्रत्येकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करताना रोहित म्हणाला,''कोण एक खेळला तर दुसऱ्याला बाहेर बसावे लागेल. प्लेइंग इलेव्हन निवडताना आमची डोकेदुखी वाढतेय, कारण सर्वच चांगले खेळाडू आहेत. पण, प्रत्येकाला या स्पर्धेत संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल.''

खेळपट्टी कशी आहे?
शुक्रवारी आम्ही खेळपट्टी पाहिली आणि त्यावर थोडसं गवत दिसत आहे. त्यामुळे अंदाज बांधणे अवघड आहे. प्रत्येक संघात क्वालिटी आहे. त्यामुळे या स्पर्धेत फिरकीपटू वर्चस्व गाजवतील की नाही, याची आम्हाला कल्पना नाही. पाकिस्तानच्या संघात शाहिन आफ्रिदी नाही, तर आमच्याकडे जसप्रीत बुमराह नाही. पण, अन्य खेळाडू त्यांच्या संधीचं सोनं करतील. ही नवी स्पर्धा आहे आणि प्रत्येकजण १०० टक्के देण्यासाठी आतूर आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळणे हे आव्हानात्मक असेल, यात शंका नाही.  

फलंदाजीचा क्रम कसा असेल?
याचा निर्णय मुख्य प्रशिक्षक घेतील. विराट कोहलीचं विचारात असाल तर त्याने नेट्समध्ये दमदार फलंदाजी केलीय. त्याने फलंदाजीत फार प्रयोग केलेले नाहीत. महिन्याभराच्या विश्रांतीनंतर तो मैदानावर उतरला आहे आणि तो फ्रेश दिसतोय. तो प्रचंड मेहनत घेतोय.  भारत-पाकिस्तानची दुष्मनी एकीकडे, पण हा सामना चांगला रंगेल. तुम्ही बाहेरून याची वातावरण निर्मिती करा आणि मैदानावर दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो.  

 

भारत - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंह, आवेश खान. 

Web Title: Asia Cup 2022 IND vs PAK Rohit Sharma PRESS Conference : Rohit Sharma said, Virat Kohli looked in great touch in the nets. He is working extremely hard, We haven't decided the X1, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.