Asia Cup 2022, IND vs PAK Virat Kohli makes shocking revelation : भारतीय संघाचे चाहते ज्या परफॉर्मन्सची आतुरतेने वाट पाहत होते, तो अखेर आज झाला. विराट कोहलीने धमाकेदार खेळ करताना पाकिस्तानच्या गोलंदाजांची नाकी नऊ आणले. विराटने ४४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार मारून ६० धावा चोपल्या. पण, पाकिस्तानने हा सामना जिंकून आशिया चषक २०२२ स्पर्धेत १-१ अशी बरोबरी केली. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने बाबर आजमच्या संघाला पराभूत केले होते. या पराभवानंतर पत्रकार परिषदेत आलेल्या विराट कोहलीने पुन्हा एकदा BCCI ची झोप उडेल असे विधान केले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराटची पत्रकार परिषद गाजली होती आणि ते प्रकरण हाताळताना बीसीसीआयची तारांबळ उडाली होती. आजही विराटने असेच काहीसे विधान केले.
विराट कोहली म्हणाला, ''या सामन्यात आमचा रन रेट सुधारला. आमच्या हातात आणखी काही विकेट्स असत्या तर २०-२५ धावा अधिक झाल्या असत्या. मोहम्मद नवाजने सामना पूर्णपणे फिरवला. बाबर व रिझवान यांच्याकडून चांगल्या सुरूवातीची सर्वांना अपेक्षा होती, परंतु नवाजच्या खेळीने छाप पाडली. '' विश्रांतीच्या एक महिन्यात बॅटला हातही लावणार नाही, असा विचार मी केला नव्हता, परंतु तसे करणे गरजेचे होते, असे विराट म्हणाला.'' मला थोडी स्पेस हवी होती. या परिस्थितीपासून कुणी पळ काढणार नाही. विश्रांती घेणे म्हणजे चूक नव्हते. पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी ते महत्त्वाचे होते. मी आनंदी आहे आणि हा क्षण एन्जॉय करतोय. फॉर्म परत आल्याचा आनंद आहे,''असेही तो म्हणाला.
तेव्हा फक्त MS Dhoni ने मला मॅसेज केला...
मी जेव्हा कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा फक्त एक व्यक्ती ती म्हणजे महेंद्रसिंग धोनी यानेच मला मॅसेज केला. अनेकांकडे माझा नंबर होता, पण ते केवळ टीव्हीवरील एक्स्पर्ट आहेत. MS चा मॅसेज माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे बाकीचे काय म्हणतात याला मी महत्त्व देत नाही. मी माझं आयुष्य प्रामाणिकपणे जगतो आणि हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे,'' विराट कोहलीच्या या विधानाने त्याचे व धोनीचे नाते किती घट्ट आहे हे दिसून येते. पण, या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटण्याचे संकेत आहेत.
Web Title: Asia Cup 2022, IND vs PAK : Virat Kohli said, "when I left Test captaincy, only MS Dhoni messaged me out of so many people who had my number. There's a different bond with MS".
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.