Asia Cup 2022, IND vs PAK : Jay Shah यांनी तिरंगा हाती घेण्यास का दिला नकार?; जाणून घ्या त्यामागचं कारण

Asia Cup 2022, India vs Pakistan : भारतीय संघाने रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ५ विकेट्स राखून विजय मिळवताना आशिया चषक २०२२ स्पर्धेत गुणांचे खाते उघडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 05:19 PM2022-08-29T17:19:59+5:302022-08-29T17:21:06+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2022, IND vs PAK : why Jay Shah refused to hold national flag after India’s win over Pakistan?, know reason | Asia Cup 2022, IND vs PAK : Jay Shah यांनी तिरंगा हाती घेण्यास का दिला नकार?; जाणून घ्या त्यामागचं कारण

Asia Cup 2022, IND vs PAK : Jay Shah यांनी तिरंगा हाती घेण्यास का दिला नकार?; जाणून घ्या त्यामागचं कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2022, India vs Pakistan : भारतीय संघाने रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ५ विकेट्स राखून विजय मिळवताना आशिया चषक २०२२ स्पर्धेत गुणांचे खाते उघडले. १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकात षटकार खेचून हा रोमहर्षक विजय मिळवून दिली. ३ विकेट्स व नाबाद ३३ धावांची खेळी करून हार्दिक या सामन्यातील नायक ठरला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवाचा बदला घेतल्यानंतर भारतीयांनी जल्लोष केला. पण, BCCI सचिव जय शाह ( Jay Shah) हे वेगळ्याच कारणाने चर्चेत आले.  

३ चेंडूंत ६ धावांची गरज असताना मोहम्मद नवाजच्या चेंडूवर हार्दिकने षटकार खेचला अन् स्टेडियमवर एकच जल्लोष झालेला पाहायला मिळाला. यावेळी जय शाह हेही दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आले होते. भारताच्या विजयानंतर स्टेडियमवर चाहत्यांनी तिरंगा फडकवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी जय शाह यांच्या शेजारी असलेल्या व्यक्तीच्या हातात तिरंगा दिसला. त्याने तो जय शाह यांना देऊ केला अन् शाह यांनी नकार दिला. विरोधकांनी जय शाह यांच्या कृतीचा तो व्हिडीओ पोस्ट करून टीका केली. नेटिझन्सनीही BCCI सचिवांची शाळा घेतली.

जय शाह हे आशियाई क्रिकेट परिषदेचे ( ACC) अध्यक्षही आहेत आणि ACC च्या नियमानुसार सर्व सदस्यांप्रती अध्यक्षांनी समान भावना ठेवायला हवी. त्यामुळेच त्यांनी तिरंगा हाती घेतला नसल्याचे ट्विट Fact यांनी केलं आहे.  


या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने टीमचे कौतुक केले. तो म्हणाला, आम्हाला विजयाचा आत्मविश्वास होता. प्रत्येक खेळाडूला त्याच्या जबाबदारीबद्दल स्पष्ट सांगितले आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला माहित्येय काय करायचे. हा सामना आव्हानात्मक होता, परंतु असा विजय मला केव्हाही मिळवायला आवडेल. आमचे गोलंदाज मागील 12 महिने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. हार्दिक पांड्या पुनरागमनानंतर सातत्याने दमदार कामगिरी करतोय. आव्हानात्मक परिस्थितीतून जिंकू शकतो, हा विश्वास संघातील प्रत्येकात आहे.
 

Web Title: Asia Cup 2022, IND vs PAK : why Jay Shah refused to hold national flag after India’s win over Pakistan?, know reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.