Asia Cup 2022 IND vs PAK : रोहित भाई प्लीज गले मिलो! पाकिस्तानी चाहत्याची इच्छा अन् रोहित शर्मा म्हणाला... Video 

Asia Cup 2022 IND vs PAK : भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश व हाँगकाँग या आशियातील अव्वल सहा संघांमध्ये आशिया चषक स्पर्धेच्या जेतेपदाची चुरस रंगताना पाहायला मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 04:30 PM2022-08-27T16:30:01+5:302022-08-27T16:41:31+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2022 IND vs PAK : With Pakistani fans asking for a hug, Rohit Sharma stepped out of the ground and went and greeted them, Video | Asia Cup 2022 IND vs PAK : रोहित भाई प्लीज गले मिलो! पाकिस्तानी चाहत्याची इच्छा अन् रोहित शर्मा म्हणाला... Video 

Asia Cup 2022 IND vs PAK : रोहित भाई प्लीज गले मिलो! पाकिस्तानी चाहत्याची इच्छा अन् रोहित शर्मा म्हणाला... Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2022 IND vs PAK : सर्वाधिक ७ वेळा आशिया चषक उंचावणारा भारतीय संघ आता रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली पुन्हा एकदा करिष्मा करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश व हाँगकाँग या आशियातील अव्वल सहा संघांमध्ये आशिया चषक स्पर्धेच्या जेतेपदाची चुरस रंगताना पाहायला मिळणार आहे. श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्या लढतीने आजपासून आशिया चषक २०२२ ला सुरूवात होत आहे. सर्व संघातील खेळाडू कसून सराव करतानाही दिसत आहेत आणि फॅन्सही त्यांना सपोर्ट करायला पोहोचले आहेत. भारतीय खेळाडूंचे जगभरात चाहते आहेत आणि याची प्रचिती दुबईतही येत आहे.

उत्सुकता India vs Pakistan सामन्याची, पण जाणून घ्या आशिया चषक स्पर्धेची सर्व माहिती

विराट कोहली व रोहित शर्मा यांचे पाकिस्तानमध्येही चाहते आहेत. दोन दिवसांपूर्वी विराटने लाहोरहून आलेल्या त्याच्या चाहत्याची इच्छा पूर्ण करून त्याच्यासोबत सेल्फी काढली. त्यानंतर एका दिव्यांग मुलीसोबतही विराटने फोटो काढला. रोहितही त्याच्या चाहत्यांना भेटतानाचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. एक पाकिस्तानी फॅन तर रोहित भाई प्लीज गले मिलो, असे गयावया करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सीमारेषेवर सराव करताना रोहितच्या नावाने तो जोरजोरात ओरडून विनवणी करताना दिसतोय. मग अचानक रोहित त्या फॅन्सजवळ गेला अन् त्यांच्यासोबत सेल्फी काढली. त्याने पाकिस्तानी चाहत्याची झप्पीची इच्छाही पूर्ण केली..

पाहा व्हिडीओ.. 





आशिया चषक स्पर्धेचा इतिहास
१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. पाच जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आणि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. 
 

Web Title: Asia Cup 2022 IND vs PAK : With Pakistani fans asking for a hug, Rohit Sharma stepped out of the ground and went and greeted them, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.