Asia Cup 2022 IND vs PAK : सर्वाधिक ७ वेळा आशिया चषक उंचावणारा भारतीय संघ आता रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली पुन्हा एकदा करिष्मा करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश व हाँगकाँग या आशियातील अव्वल सहा संघांमध्ये आशिया चषक स्पर्धेच्या जेतेपदाची चुरस रंगताना पाहायला मिळणार आहे. श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्या लढतीने आजपासून आशिया चषक २०२२ ला सुरूवात होत आहे. सर्व संघातील खेळाडू कसून सराव करतानाही दिसत आहेत आणि फॅन्सही त्यांना सपोर्ट करायला पोहोचले आहेत. भारतीय खेळाडूंचे जगभरात चाहते आहेत आणि याची प्रचिती दुबईतही येत आहे.
उत्सुकता India vs Pakistan सामन्याची, पण जाणून घ्या आशिया चषक स्पर्धेची सर्व माहिती
विराट कोहली व रोहित शर्मा यांचे पाकिस्तानमध्येही चाहते आहेत. दोन दिवसांपूर्वी विराटने लाहोरहून आलेल्या त्याच्या चाहत्याची इच्छा पूर्ण करून त्याच्यासोबत सेल्फी काढली. त्यानंतर एका दिव्यांग मुलीसोबतही विराटने फोटो काढला. रोहितही त्याच्या चाहत्यांना भेटतानाचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. एक पाकिस्तानी फॅन तर रोहित भाई प्लीज गले मिलो, असे गयावया करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सीमारेषेवर सराव करताना रोहितच्या नावाने तो जोरजोरात ओरडून विनवणी करताना दिसतोय. मग अचानक रोहित त्या फॅन्सजवळ गेला अन् त्यांच्यासोबत सेल्फी काढली. त्याने पाकिस्तानी चाहत्याची झप्पीची इच्छाही पूर्ण केली..
पाहा व्हिडीओ..