Join us  

Asia Cup 2022, IND vs SL : Rohit Sharma, सूर्यकुमार यादव जबरदस्त खेळले; अन्य फलंदाज ढेपाळले! श्रीलंकेने कमबॅक केले 

रोहितने मुंबईकर सूर्यकुमार यादवला सोबतीला घेऊन तिसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूंत ९७ धावा जोडल्या आणि भारताला आश्वासक धावसंखेच्या दिशेने वाटचाल करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2022 9:29 PM

Open in App

Asia Cup 2022, India vs Sri Lanka Live : रोहित शर्माने ( Rohit Sharma) आज कॅप्टन्स इनिंग्ज खेळली. २ बाद १२ अशी दयनीय अवस्था श्रीलंकेच्या गोलंदाजांनी केल्यानंतर भारतीय चाहते निराश झाले होते. पण, रोहितने मुंबईकर सूर्यकुमार यादवला सोबतीला घेऊन तिसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूंत ९७ धावा जोडल्या आणि भारताला आश्वासक धावसंखेच्या दिशेने वाटचाल करून दिली. पण, श्रीलंकेच्या गोलंदाजांनी या दोघांना मागोमाग बाद करून पुन्हा भारताची धावगती संथ केली. हार्दिक पांड्या, रिषभ पंत  व दीपक हुडा यांनी पुन्हा निराश केले. रोहित बाद झाल्यानंतर ६३ धावांत भारताने ६ फलंदाज गमावले. 

भारताला आणखी एक धक्का, रवींद्र जडेजानंतर जलदगती गोलंदाजाची स्पर्धेतून माघार

श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्याच षटकात महिषा थिक्षानाने भारताला धक्का देताना लोकेश राहुलला LBW केले. लोकेश ६ धावांवर माघारी परतला. विराट कोहली मैदानावर आल्यावर श्रीलंकेने आक्रमम क्षेत्ररक्षण लावले आणि त्याचा फायदा झाला. विराटसाठी दोन स्लीप लावल्या गेल्या अन् दिलशान मदुशंकाने अप्रतिम यॉर्कर टाकून विराटला भोपळ्यावर ( ४ चेंडू) त्रिफळाचीत केले. १२ धावांवर २ फलंदाज गमावल्यानंतर रोहितने सूत्र हाती घेतली. सावध, परंतु अधुनमधून षटकार-चौकार खेचून रोहितने भारताच्या धावांचा वेग वाढवला. सूर्यकुमार यादव संयमी खेळ करताना दिसला. भारताने आठव्या षटकात फलकावर ५० धावा पूर्ण केल्या. ४० धावांवर रोहितचा झेल सुटला. श्रीलंकेचा कर्णधार शनाकाने चेंडू टिपण्यासाठी डाईव्ह मारली, परंतु त्याचा प्रयत्न अपयशी ठरला. 

रोहितने आशिया चषक ( वन डे व ट्वेंटी-२०) स्पर्धेत १००० धावांचा टप्पा ओलांडला. सनथ जयसूर्या ( १२२०) व कुमार संगकारा ( १०७५) यांच्यानंतर आशिया चषक स्पर्धेत हजार+ धावा करणारा रोहित ( १०१६) तिसरा फलंदाज, परंतु पहिला भारतीय ठरला.  सचिन तेंडुलकरने ९७१ व विराटने ९२० धावा केल्या आहेत. चमिका करुणारत्नेने ही महत्त्वाची विकेट घेतली. रोहित ४१ चेंडूंत ५ चौकार व व ४ षटकारांसह ७२ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ शनाकाने सेट फलंदाज सूर्यकुमारला ( ३४) बाद केले. इथून पुन्हा भारताची गाडी घसरली.  हार्दिक पांड्या ( १७), रिषभ पंत ( १७) व दीपक हुडा ( ३ ) धावांवर माघारी परतले. दिलशान मदुशंकाने २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. भारताला ८ बाद १७३ धावांपर्यंत मजल मारता आली. 

टॅग्स :एशिया कप 2022रोहित शर्माभारत विरुद्ध श्रीलंकासूर्यकुमार अशोक यादव
Open in App