Asia Cup 2022, IND vs SL : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) ने आशिया चषक २०२२ स्पर्धेतील सुपर ४ मधील सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ६० धावांची खेळी केली. विराटने त्याचा फॉर्म परतल्याचा जणू संकेतच दिले, पण सामन्यानंतर त्याच्या या खेळीपेक्षा विधानाची चर्चा रंगली. विराटने केलेले विधान अनेकांना झोंबले, BCCIने तर त्यावर भाष्य करणे सध्यातरी टाळलेले दिसतेय. महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavskar) यांनी तर टीकाच केली. आता भारत-श्रीलंका लढतीच्या काही तासांपूर्वी विराटने इंस्टा स्टोरीवर पुन्हा एक स्टोरी पोस्ट केली आणि त्याने तर थेट ''अशा लोकांना ओळखा'' असं लिहून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेला आलेल्या विराटने MS Dhoniबद्दल वाक्य काढले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना जेव्हा विराटने कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा फक्त आणि फक्त महेंद्रसिंग धोनीने त्याला मेसेज केल्याचा दावा त्याने केला. तो म्हणाला, अनेकांकडे माझा नंबर होता, परंतु फक्त धोनीने मला मेसेज केला. आम्ही एकमेकांचा आदर करतो आणि एकमेंकाप्रती असुरक्षितता आम्हाला कधी वाटली नाही. हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे मला जर कोणाला सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट बोला, TVवरून देऊ नका.
विराटच्या या विधानावर गावस्करांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना म्हटले, "या सर्व खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूममध्ये काय परिस्थिती होती हे मला माहीत नाही. मला असे वाटते की जर त्याने त्याच्याशी संपर्क साधलेल्या एका व्यक्तीचे नाव घेतले आहे मग संपर्क न साधलेल्या इतर लोकांचीही नावे त्याने घ्यायला हवीत. मग प्रत्येकजण त्याच्याशी संपर्क साधत नाही असा विचार करण्याऐवजी संबंधित प्रत्येक व्यक्तीला समजण्यासाठी हे थोडे सोप्पे ठरेल."
विराटची इस्टा स्टोरी - तुमच्या आनंदात आनंदीत आणि दुःखात दुःखी होणाऱ्या लोकांना ओळखा. तुमच्या हृदयात अशा लोकांसाठी जागा असायला हवी.