Asia Cup 2022, India vs Sri Lanka Live : श्रीलंकेची स्पर्धेतील सुरुवात खराब झाली असली तरी त्यांनी जबरदस्त कमबॅक केलेले पाहायला मिळतेय. त्यांनी पहिल्या तीन षटकांत लोकेश राहुल व विराट कोहली यांची विकेट घेताना भारताची अवस्था २ बाद १२ अशी केली आहे. पण, कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) सामन्याची सूत्र हाती घेताना श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील ३२वे अर्धशतक पूर्ण करताना विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याने सूर्यकुमार यादवसह तिसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूंत ९७ धावा जोडताना अनेक विक्रम केला. एक असा विक्रमही केला जो आतापर्यंत आशिया चषक स्पर्धेत एकाही भारतीयाला जमला नाही.
पाकिस्तानकडून हरलो म्हणजे सर्व संपलं, असं नाही! टीम इंडिया अजूनही फायनल गाठू शकते; जाणून घ्या गणित
श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यात आम्ही येथे धावांचा यशस्वी पाठलाग केल्याने हा निर्णय घेतल्याचे शनाकाने सांगितले. आम्हालाही प्रथम गोलंदाजी करण्यास आवडले असते असे रोहितने सांगितले. भारतीय संघात एक बदल केला गेला असून रवि बिश्नोईच्या जागी आर अश्विनला संधी मिळाली आहे. लोकेश राहुल व रोहित शर्मा ही जोडी सलामीला आली. दुसऱ्याच षटकात महिषा थिक्षानाने भारताला धक्का देताना लोकेश राहुलला LBW केले. पण, लोकेशने DRS घेतला. मैदानावरील अम्पायरने त्याल बाद दिले होते. तिसऱ्या अम्पायरने बराच वेळ घेतला. चेंडूचा आधी बॅटला की बुटाशी संपर्क झालाय हेच त्यांना ठरवता आले नाही आणि अपूऱ्या पुराव्या अभावी त्यांनी मैदानावरील अम्पायरचा निर्णय कायम राखला. लोकेश ६ धावांवर माघारी परतला.
विराट कोहली मैदानावर आल्यावर श्रीलंकेने आक्रमम क्षेत्ररक्षण लावले आणि त्याचा फायदा झाला. विराटसाठी दोन स्लीप लावल्या गेल्या अन् दिलशान मदुशंकाने अप्रतिम यॉर्कर टाकून विराटला भोपळ्यावर ( ४ चेंडू) त्रिफळाचीत केले. १२ धावांवर २ फलंदाज गमावल्यानंतर रोहितने सूत्र हाती घेतली. सावध, परंतु अधुनमधून षटकार-चौकार खेचून रोहितने भारताच्या धावांचा वेग वाढवला. सूर्यकुमार यादव संयमी खेळ करताना दिसला. भारताने आठव्या षटकात फलकावर ५० धावा पूर्ण केल्या. ४० धावांवर रोहितचा झेल सुटला. श्रीलंकेचा कर्णधार शनाकाने चेंडू टिपण्यासाठी डाईव्ह मारली, परंतु त्याचा प्रयत्न अपयशी ठरला. रोहितने ३२ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील ३२वे अर्धशतक पूर्ण केले. विराटच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली.
रोहितने आशिया चषक ( वन डे व ट्वेंटी-२०) स्पर्धेत १००० धावांचा टप्पा ओलांडला. सनथ जयसूर्या ( १२२०) व कुमार संगकारा ( १०७५) यांच्यानंतर आशिया चषक स्पर्धेत हजार+ धावा करणारा रोहित ( १०१६) तिसरा फलंदाज, परंतु पहिला भारतीय ठरला. सचिन तेंडुलकरने ९७१ व विराटने ९२० धावा केल्या आहेत. चमिका करुणारत्नेने ही महत्त्वाची विकेट घेतली. रोहित ४१ चेंडूंत ५ चौकार व व ४ षटकारांसह ७२ धावांवर बाद झाला.
Web Title: Asia Cup 2022, IND vs SL : Record: Rohit Sharma becomes the first Indian cricketer to complete 1000 runs in Asia Cup history, Captain scored 72 runs from 41 balls
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.