Asia Cup 2022, India vs Sri Lanka Live : भारताला Super 4 मधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने पराभूत केले. पाकिस्तानने आशिया चषक २०२२ स्पर्धेतील हिशोब १-१ असा बरोबर केला. श्रीलंका आणि पाकिस्तान यांनी सुपर ४ मध्ये आपापल्या पहिल्या लढती जिंकून फायनलच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे. भारताचे अजून दोन सामने शिल्लक आहेत. श्रीलंकेविरुद्धचा आजचा सामना भारतासाठी करो व मरो असा आहे... आज भारत हरल्यास त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात येईल आणि श्रीलंका फायनल गाठेल. पण, आज जिंकून अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यात ( ८ सप्टेंबर) बाजी मारून भारताला अंतिम फेरी गाठता येणार आहे. त्यामुळे आता भारताला उर्वरीत दोन्ही सामने जिंकावे लागतील.
श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नसली तरी त्यांनी बांगलादेश व अफगाणिस्तान यांच्यावर मागील दोन सामन्यांत रोमहर्षक विजय मिळवला आणि आत्मविश्वास कमावला. आशिया चषक स्पर्धेतील भारत-श्रीलंका यांच्यातील जय-पराजयाची आकडेवारी १०-१० अशी बरोबरीची आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यात आम्ही येथे धावांचा यशस्वी पाठलाग केल्याने हा निर्णय घेतल्याचे शनाकाने सांगितले. आम्हालाही प्रथम गोलंदाजी करण्यास आवडले असते असे रोहितने सांगितले.
भारतीय संघात एक बदल केला गेला असून रवि बिश्नोईच्या जागी आर अश्विनला संधी मिळाली आहे. मागील सामन्यात महागडा ठरलेल्या चहलला आज विश्रांती मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु रवी बिश्नोईला एक मॅच खेळवून पुन्हा बाकावर बसवले. रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, रिषभ पंत, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल असा भारतीय संघ आहे.
Web Title: Asia Cup 2022, IND vs SL : Sri Lanka won the toss and decided to bowl first, Ravi Ashwin replaces Ravi Bishnoi.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.