Asia Cup 2022, India vs Sri Lanka Live : कुसल मेंडिस व पथूम निसंका यांनी श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. भारताने विजयासाठी ठेवलेले १७४ धावांचे लक्ष्य हे दोघंच पार करतील असे चित्र दिसत होते. भारतीय चाहत्यांचे चेहरे पडले होते. मेंडिस व निसंका यांनी ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारताविरुद्धची सर्वोत्तम ओपनिंग भागीदारीचा विक्रम करताना ९७ धावा जोडल्या. पण, युजवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal) एका षटकाने सामन्यात जीव ओतला. चहरने निसंका व चरिथ असलंका यांना माघारी पाठवून भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणला. रोहित शर्माने निसंकाचा सुरेख झेल टिपला.
रोहित शर्माने ( Rohit Sharma) आज कॅप्टन्स इनिंग्ज खेळली. २ बाद १२ अशी दयनीय अवस्था श्रीलंकेच्या गोलंदाजांनी केल्यानंतर भारतीय चाहते निराश झाले होते. पण, रोहितने मुंबईकर सूर्यकुमार यादवला सोबतीला घेऊन तिसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूंत ९७ धावा जोडल्या. हार्दिक पांड्या, रिषभ पंत व दीपक हुडा यांनी पुन्हा निराश केले. रोहित बाद झाल्यानंतर ६३ धावांत भारताने ६ फलंदाज गमावले. लोकेश राहुल ( ६) व विराट कोहली (० ) बाद झाल्यानंतर रोहित व सुर्याने डाव सावरला. रोहित ४१ चेंडूंत ५ चौकार व व ४ षटकारांसह ७२ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ शनाकाने सेट फलंदाज सूर्यकुमारला ( ३४) बाद केले. इथून भारताची गाडी घसरली. हार्दिक पांड्या ( १७), रिषभ पंत ( १७) व दीपक हुडा ( ३ ) धावांवर माघारी परतले. दिलशान मदुशंकाने २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. भारताला ८ बाद १७३ धावांपर्यंत मजल मारता आली. आर अश्विनने ७ चेंडूंत १५ धावा केल्या.
कुसल मेंडिस व पथूम निसंका यांनी श्रीलंकेला चांगली सुरूवात करून दिली. अर्शदीप सिंगने टाकलेल्या पाचव्या षटकात श्रीलंकन जोडीने १८ धावा कुटल्या. श्रीलंकने ५.२ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या. पहिल्या पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता श्रीलंकेने ५७ धावा केल्या. भारताचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरताना दिसले. मेंडिस व निसंका यांनी ७२ धावांची केलेली भागीदारी ही भारताविरुद्धची ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम ओपनिंग भागीदारी ठरली. भारताचे क्षेत्ररक्षणही ढिसाळ होताना दिसले. त्यामुळे रन आऊटच्या संधीही हुकल्या. मेंडिस व निसंका ही जोडी भारतीय खेळाडूंवर भारी पडली. हे दोघं सहज चोरटी धाव घेत होते. निसंकाने ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. १२व्या षटकात युजवेंद्र चहलने भारताला पहिले यश मिळवून दिले. ३७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ५२ धावा करणारा निसंकाचा रोहितने अप्रतिम झेल टिपला. त्याच षटकात चरिथ असलंका ( ०) माघारी परतला.
Web Title: Asia Cup 2022, IND vs SL : Two wickets in the over for Yuzvendra Chahal,first Nissanka and now Asalanka, Sri Lanka two down for 97
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.