Rohit Sharma: धोनीचा, विराटचा, माजी पाकिस्तानी कर्णधाराचा….सगळ्यांचा रेकॉर्ड मोडणार ‘हिटमॅन’

Rohit Sharma: भारत आणि हाँगकाँग यांच्यात बुधवार होणाऱ्या सामन्यात रोहितकडे मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 02:22 PM2022-08-30T14:22:33+5:302022-08-30T14:22:33+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2022; India vs Hong Cong: Rohit Sharma will break all records of Dhoni, Virat and former Pakistan captain | Rohit Sharma: धोनीचा, विराटचा, माजी पाकिस्तानी कर्णधाराचा….सगळ्यांचा रेकॉर्ड मोडणार ‘हिटमॅन’

Rohit Sharma: धोनीचा, विराटचा, माजी पाकिस्तानी कर्णधाराचा….सगळ्यांचा रेकॉर्ड मोडणार ‘हिटमॅन’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma: आशिया चषकात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर टीम इंडियासमोरचे हाँगकाँगचे आव्हान आहे. हाँगकाँगने आशिया चषकाच्या पात्रता फेरीत विजय मिळवून आपली क्षमता सिद्ध केली असली तरी बलाढ्य भारतासमोर ते कसे खेळणार हे पाहणे मनोरंजक असेल. टीम इंडियासाठीही हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण यात फलंदाजांना आत्मपरीक्षण करण्याची चांगली संधी मिळणार आहे. कर्णधार रोहित शर्मालाही या सामन्यात मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. तो धोनी, विराट कोहली आणि पाकिस्तानच्या मोईन अलीलाही मागे टाकू शकतो.

रोहित शर्मा धोनी-मोईन खानला मागे टाकणार?
रोहित शर्माला आशिया कपमध्ये नवा विक्रम करण्याची संधी आहे. रोहित शर्मा आशिया कपमध्ये सलग 7 सामने जिंकणारा कर्णधार बनू शकतो. एमएस धोनी आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार मोईन अली यांच्या नावावर सलग 6 सामने जिंकण्याचा विक्रम आहे. रोहित शर्माने कर्णधार म्हणून आशिया चषकातही सलग 6 सामने जिंकले आहेत आणि जर टीम इंडिया हाँगकाँगविरुद्ध जिंकली तर रोहित सलग 7 सामने जिंकणारा कर्णधार बनेल.

विराटलाही मागे टाकणार...
रोहित शर्माकडे विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी आहे. रोहित शर्मा हाँगकाँगविरुद्ध जिंकला तर तो भारताचा दुसरा यशस्वी T20 कर्णधार होईल. विराट कोहलीने T20 मध्ये 30 विजय मिळवले आहेत. तर, धोनीच्या नावावर सर्वाधिक 41 टी-20 विजय आहेत. विराटचा विक्रम मोडल्यानंतर धोनीचा विक्रमही रोहितच्या निशाण्यावर असेल.

भारताचा पुन्हा पाकिस्तानशी सामना
टीम इंडियासमोर पुन्हा एकदा पाकिस्तानचे आव्हान असणार आहे. ब गटात पाकिस्तानने हाँगकाँगला हरवले तर रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकतो. पाकिस्तानचा सामना करण्यासाठी भारतालाही हाँगकाँगवर विजय मिळवावा लागेल. कालच्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजीसमोर भारतीय टॉप ऑर्डर अपयशी ठरली होती, पण आता पुढच्या सामन्यात आणखी जोर लावावा लागणार.

Web Title: Asia Cup 2022; India vs Hong Cong: Rohit Sharma will break all records of Dhoni, Virat and former Pakistan captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.