Asia Cup 2022 Live Streaming : दोन दिवसांनंतर आशियातील अव्वल ६ संघ दुबईत भिडणार आहेत. चार वर्षांनी होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेची आशियाई क्रिकेट चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. खास करून भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) या लढतीची जगाला प्रतीक्षा आहे. मागील वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कट्टर प्रतिस्पर्धी प्रथमच समोरासमोर येत आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेला जगात डिमांड आहे आणि जवळपास १३२ देशांमध्ये या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. पाच जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आणि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- १३२ देशांमध्ये आशिया चषक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण
- भारत-पाकिस्तान सामन्याला खूप अधिक मागणी आहे. २८ ऑगस्टला कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार आहेत आणि त्यानंतरही दोन वेळा हे संघ समोरासमोर येण्याची शक्यता आहे
- श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्या लढतीने आशिया चषक स्पर्धेची पहिली लढत होणार आहे.
- आशिया चषक स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाचे सर्वाधिक राईट्स स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने खरेदी केले आहेत. त्यांनी अन्य टीव्ही चॅनेलला या राईट्सच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाची परवानगी दिली आहे.
- रवी शास्त्री, इरफान पठाण, गौतम गंभीर, रसेल अरनॉल्ड, दीप दासगुप्ता, स्कॉट स्टायरिस, संजय मांजरेकर, वसीम अक्रम, वकार युनीस, अथर अली खान हे समालोचन करणार आहेत.
- पाकिस्तान - PTV Sports, Ten Sports, Daraz आणि Tapmad
- बांगलादेश - Gazi TV (GTV) / Total Sportsवर फिड शेअर केले जाणार
- ऑस्ट्रेलिया - Fox Sports
- न्यूझीलंड - Sky Sports
- दक्षिण आफ्रिका - SuperSport network
- अमेरिका, कॅनडा, नॉर्थ अमेरिका मार्केट - Willow TV
- लंडन - Sky Sports Network
- मध्य पूर्व व उत्तर आफ्रिका - OSN Sports Cricket HD
- अफगाणिस्तान - Ariana TV
- कॅरेबियन - Flow TV
- ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, उपखंडीय युरोप, मलेशिया, जपान, दक्षिण पूर्व आशिया - Yupp TV
- भारत- स्टार स्पोर्ट्स, Disney+Hotstar, DD SPORTS