मुंबई - या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. आशिया खंडातील या सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात विराट कोहलीचं पुनरागमन झालं आहे. विराटसह लोकेश राहुलचाही संघात समावेश झाला आहे. मात्र भारताचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराह याला दुखापतीमुळे संघात स्थान मिळालेलं नाही.
आशिया करंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात सूर्यकुमार यादव, दीपक हूडा, अर्शदीप सिंग आणि अवेश खान या युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच विराट कोहली आणि केएल राहुल यांचं पुनरागमन झाल्याने भारतीय संघाची फलंदाजी बळकट झाली आहे.
आशिया करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, अवेश खान.