Asia Cup 2022 : फॉर्माशी झगडत असला तरी विराट कोहलीचे ( Virat Kohli) आजही जगभरात चाहते आहेत. त्यात भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानातही विराटच्या चाहत्यांची संख्या अधिक आहे. कधी पाकिस्तानच्या जर्सीवर विराट कोहली नाव लिहून चाहता फिरताना दिसतो, तर पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये विराटला तेथे खेळण्यासाठी येण्याची विनंती केली जाते. भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईत दाखल झाला आहे आणि तेथे खेळाडू कसून सरावालाही लागले आहेत. काल सराव सत्र संपल्यानंतर विराट परत जात असताना पाकिस्तानी फॅनने त्याच्या दिशेने धाव घेतली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला रोखले, पण पुढे जे घडले ते अनपेक्षित होते...
आशिया चषक २०२२ स्पर्धेला २७ ऑगस्टपासून श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्या लढतीने सुरुवात होणार आहे. India vs Pakistan यांच्यात २८ ऑगस्टला होणाऱ्या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे आणि १३२ देशांमध्ये आशिया चषक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होणार आहे. त्यातही भारत-पाकिस्तान सामन्याला सर्वाधिक डिमांड आहे. हाँगकाँग आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा अखेरचा संघ ठरला आहे आणि आता वेळापत्रक पूर्ण झाले आहे. सर्व संघ दुबईत दाखल झाले आहेत आणि त्यांनी सरावाला सुरुवातही केली आहे. काल क्रिकेट चाहत्यांसाठी दुग्धशर्करा योग जुळून आला, विराट कोहली व बाबर आजम ( Virat Kohli meets Babar Azam in Dubai) यांची ग्रेट भेट झाली.
विराट कोहली सराव सत्र संपवून परत जात असताना पाकिस्तानचा एक फॅन त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी मागे मागे आला. त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रोखले. कोहलीने त्याच्याकडे पाहिले व तो पुढे निघून गेला. पण, जेव्हा त्या फॅनने पाकिस्तानातून एका फोटोसाठी येथे आल्याचे सांगितले. तेव्हा कोहली थोड्यावेळाने बाहेर आला अन् त्याने लाहोरमधून आलेल्या चाहत्यासोबत सेल्फी काढला. मोहम्मद जिब्रान असे त्या फॅनचे नाव होते आणि PakTV हा पूर्ण व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Web Title: Asia Cup 2022 : Indian star Virat Kohli's incredible gesture for Pakistan fan who was stopped by security guards for approaching him, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.