Join us  

Asia Cup 2022 Mujeeb Ur Rehman: अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमानचे T20 मध्ये अनोखं द्विशतक! रचला मोठा विक्रम

पॉवर-प्ले मध्ये बांगलादेशच्या फलंदाजांची दाणादाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 8:10 PM

Open in App

Asia Cup 2022 Mujeeb Ur Rehman: बांगलादेशचा अनुभवी कर्णधार शाकिब अल हसन याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण सुरूवातीच्या टप्प्यातच त्याचा हा निर्णय काहीसा फसला. श्रीलंकेविरूद्ध दमदार विजय मिळवणाऱ्या अफगाणिस्ताननेबांगलादेशलाही चांगलेच नाकी नऊ आणले. अफगाणिस्तानचा मिस्टरी स्पिनर मुजीब उर रहमान याने सामन्यातील पॉवर-प्ले च्या षटकांमध्येच कमाल करून दाखवली. त्याने आपल्या पॉवर-प्ले मध्ये ३ षटके टाकली आणि त्यात अतिशय भेदक मारा करत एक नवा विक्रम रचला. (BAN vs AFG Live Updates)

बांगलादेशने फलंदाजीला सुरूवात करताच दुसऱ्या षटकात अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमानने बांगलादेशला पहिला धक्का दिला. स्वत:च्या वैयक्तिक पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने मोहम्मद नईमला (६ धावा) त्रिफळाचीत केले. त्यानंतर वैयक्तिक दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अनामूल हकला (५ धावा) पायचीत केले. तर वैयक्तिक तिसऱ्या षटकात बांगलादेशचा सर्वात अनुभवी फलंदाज आणि कर्णधार शाकिब अल हसन (११ धावा) याला त्रिफळा उडवून माघारी पाठवले. यातील अनामूलला बाद करताच मुजीबने मोठा विक्रम केला. टी२० क्रिकेटमध्ये मुजीबचा हा २००वा बळी ठरला. अशी कामगिरी करणाऱ्या मोजक्या गोलंदाजांमध्ये त्याने स्थान मिळवले.

बांगलादेशचा संघ- मोहम्मद नईम, अनामूल हक, शकीब अल हसन (कर्णधार), अफिफ हुसेन, मुशफिकुर रहीम (किपर), मोसाद्देक हुसेन, महमदुल्ला, मेहेदी हसन मिराज, मोहम्मद सैफुद्दीन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान

अफगाणिस्तानचा संघ- हजरतुल्ला झाझाई, रहमानउल्ला गुरबाज (किपर), इब्राहिम झादरान, नजीबुल्ला झादरान, करीम जनात, मोहम्मद नबी (कर्णधार), राशिद खान, अजमतुल्ला उमरझाई, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी

टॅग्स :एशिया कप 2022अफगाणिस्तानबांगलादेशटी-20 क्रिकेट
Open in App