Asia Cup 2022, PAK vs HK : बाबर आजम अपयशी ठरला, मोहम्मद रिझवान पुन्हा संकटमोचक ठरला; हाँगकाँगने दम दाखवला

Asia Cup 2022, Pakistan vs HongKong : विजय मिळवून Super 4 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पाकिस्तानला आशिया चषक २०२२ स्पर्धेत हाँगकाँगकडून कडवी टक्कर मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 09:19 PM2022-09-02T21:19:23+5:302022-09-02T21:20:13+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2022, PAK vs HK : Pakistan put on 193/2 against Hong Kong. Mohammad Rizwan scored an unbeaten 78 in 57 balls, Khushdil Shah finished the innings with 35 in just 15 balls with 5 sixes. | Asia Cup 2022, PAK vs HK : बाबर आजम अपयशी ठरला, मोहम्मद रिझवान पुन्हा संकटमोचक ठरला; हाँगकाँगने दम दाखवला

Asia Cup 2022, PAK vs HK : बाबर आजम अपयशी ठरला, मोहम्मद रिझवान पुन्हा संकटमोचक ठरला; हाँगकाँगने दम दाखवला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2022, Pakistan vs HongKong : विजय मिळवून Super 4 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पाकिस्तानला आशिया चषक २०२२ स्पर्धेत हाँगकाँगकडून कडवी टक्कर मिळाली. कर्णधार बाबर आजम ९ धावांवर माघारी परतल्यानंतर मोहम्मद रिझवान व फाखर जमान यांनी शतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरला, परंतु त्यांच्या धावांचा वेग संथ ठेवण्यात हाँगकाँगच्या गोलंदाजांना यश आले. हाँगकाँगचे क्षेत्ररक्षणही सुरेख झाले, परंतु अखेरच्या षटकाने वाटोळे केले. 

भारतीय संघाकडून सपाटून मार खाणारे दोन संघ पाकिस्तान व हाँगकाँग आज आशिया चषक स्पर्धेत आव्हान टीकवण्यासाठी एकमेकांना भिडले आहेत. आजच्या सामन्यातील विजेता संघ सुपर ४ मध्ये प्रवेश करेल, तर दुसऱ्याचा प्रवास इथेच संपेल.  हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताना पाकिस्तानच्या अडचणी वाढवल्या. दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही. प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला १३ धावांवर पहिला धक्का बसला. सातत्यपूर्ण कामगिरी करत आशिया चषक स्पर्धेत धमाका करण्यासाठी सज्ज असलेला बाबर आजम ( Babar Azam) पुन्हा अपयशी ठरला. हाँगकाँगच्या ३७ वर्षीय एहसान खानने तिसऱ्या षटकात बाबरचा ( ९) रिटर्न कॅच पकडला. 

मोहम्मद रिझवान व फाखर जमान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. हाँगकाँगचे गोलंदाज टिच्चून मारा करताना दिसले आणि त्यामुळे पाकिस्तानच्या धावांचा वेग मंदावलेलाच होता. १० षटकांत पाकिस्तान ७०च्या आसपास पोहोचला होता. रिझवान व जमान दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना दुसऱ्या विकेटसाठी ८१ चेंडूंत ११६ धावा जोडल्या. पुन्हा एकदा एहसान खान पाकिस्तानवर भारी पडला. ४१ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ५३ धावा करणाऱ्या जमानला त्याने बाद केले. हाँगकाँगचे क्षेत्ररक्षणही आज चांगले झाले. पाकिस्तानच्या बऱ्याच धावा त्यांनी अफलातून कामगिरी करून रोखल्या. नवा फलंदाज खुशदील शाह हा संघर्ष करताना दिसला, रिझवान एका बाजूने पाकिस्तानच्या धावा वाढवण्याचा प्रयत्न करत होता. पण, हाँगकाँगच्या क्षेत्ररक्षणासमोर तोही हतबल झाला.

रिझवानने ५७ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ७८ धावा केल्या. खुशदीलने २०व्या षटकात चार षटकार खेचले. पाकिस्तानने २ बाद १९३ धावांचा डोंगर उभा केला. खुशदील १५ चेंडूंत ५ षटकारांसह नाबाद ३५ धावा केल्या. 
 

Web Title: Asia Cup 2022, PAK vs HK : Pakistan put on 193/2 against Hong Kong. Mohammad Rizwan scored an unbeaten 78 in 57 balls, Khushdil Shah finished the innings with 35 in just 15 balls with 5 sixes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.