Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : अर्षदीप सिंगने झेल टाकला, रोहित शर्माचा 'पारा' चढला! जाणून घ्या भारताच्या पराभवाची ४ कारणं, Video  

India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight : भारतीय संघाला आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या सुपर ४ च्या लढतीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 07:35 AM2022-09-05T07:35:34+5:302022-09-05T19:40:01+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2022 Reasons behind India's defeat against Pakistan: Rohit Sharma lost his cool, Skipper vent his frustration out on arshdeep singh after he dropped asif ali in the 18th over, Video  | Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : अर्षदीप सिंगने झेल टाकला, रोहित शर्माचा 'पारा' चढला! जाणून घ्या भारताच्या पराभवाची ४ कारणं, Video  

Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : अर्षदीप सिंगने झेल टाकला, रोहित शर्माचा 'पारा' चढला! जाणून घ्या भारताच्या पराभवाची ४ कारणं, Video  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight : भारतीय संघाला आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या सुपर ४ च्या लढतीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. रोहर्षक सामन्यात पाकिस्तानने ५ विकेट्स राखून बाजी मारताना अंतिम फेरीच्या दिशेने एक पाऊल  टाकले आहे. भारताच्या १८१ धावांचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाज या जोडीने तुफान फटकेबाजी केली. भारताकडून झालेल्या ४ चुकांचा पाकिस्तानला फायदा झाला अन् त्यांनी हा सामना जिंकला.

Asia Cup 2022 : उपांत्य फेरीचे सामने नाही होणार, मग फायनलचे दोन संघ कसे ठरणार?; जाणून घ्या Super 4 चे समीकरण

रोहित शर्मा ( २८) व लोकेश राहुल ( २८ ) यांनी  ४.२ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या.  सूर्यकुमार यादव ( १३) व विराट कोहलीने २९ धावांची भागीदारी केली. रिषभ पंतने ( १४) आज मोठी खेळी करण्याची संधी गमावली. हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला. दीपक हुडाने ( १६) विराटसह २४ चेंडूंत ३७ धावांची भागीदारी केली. रवी बिश्नोईने अखेरच्या दोन चेंडूंवर चौकार खेचून भारताला ७ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारून दिली.  विराटने ४४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार मारून ६० धावा चोपल्या.

बाबर आजम अपयशी ठरल्यानंतर मोहम्मद रिझवान व मोहम्मद नवाज या जोडीने ७३ धावांची भागीदारी करून सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकवला. भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने मोक्याच्या क्षणी ही भागीदारी तोडली अन् सामना रंजक झाला. हार्दिक पांड्याने पुढील षटकात रिझवानची विकेट घेत सामना पलटवून टाकला. रवी बिश्नोईने टाकलेल्या १८व्या षटकात आसीफ अली ( Asif Ali) साठी जोरदार अपील झाले. रिषभ पंतने झेल टिपल्याचा दावा केला अन् रोहितने DRS घेतला. अल्ट्रा एजमध्ये बॉल व बॅटचा संपर्क झाल्याचे दिसले, परंतु तिसऱ्या अम्पायरने नाबाद दिले. अर्षदीप सिंगने सोपा झेल सोडला अन् तिथेच भारताच्या हातून सामनाही पूर्णपणे गेला. पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेतील हिशोब चुकता केला. 

मोहम्मद रिझवानने ५१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ७१ धावा केल्या. मोहम्मद नवाज २० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ४२ धावा कुटून गेला. खुशदील शाह ( १४*) व आसीफ अली ( १६) यांचे अखेरच्या षटकांतील योगदान महत्त्वाचे ठरले. 


 
भारताच्या पराभवाची ४ कारणं...
  1. रिषभ पंत व दीपक हुडा यांची खराब फलंदाजी
  2. हार्दिक पांड्यासाठी आजचा दिवस ठरला निराशाजन
  3. आसीफ अलीचा १८व्या षटकात अर्षदीप सिंगने सोडलेला झेल
  4. भुवनेश्वर कुमारने १९व्या षटकात दिलेल्या १९ धावा  

Web Title: Asia Cup 2022 Reasons behind India's defeat against Pakistan: Rohit Sharma lost his cool, Skipper vent his frustration out on arshdeep singh after he dropped asif ali in the 18th over, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.