Asia Cup 2022 : आशिया चषक २०२२ साठी सर्व सहा टीम यूएईत दाखल झाल्या आहेत आणि आजपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मागील ३-४ दिवस खेळाडू आशिया चषक स्पर्धेसाठी कसून करताना दिसले आणि फॅन्सही आवडत्या खेळाडूला पाहण्याची, त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची संधी शोधताना दिसत आहेत. त्यात पत्रकारही ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी दुबईत दाखल झाले आहेत. अशात पत्रकारांच्य प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने भारतीय पत्रकारांनाच उलट प्रश्न केला. मागील काही दिवसांपासून युजवेंद्र चहल व त्याची पत्नी धनश्री वर्मा ( Yuzvendra Chahal & Dhanashree Verma) यांच्या नात्यावरून उलटसुलट चर्चा सुरू होत्या. त्याला अनुसरूनच रोहितनं प्रश्न विचारला अन् ज्याने ही अफवा पसरवली त्याच्या वर्मी तो प्रश्न अचूक लागला.
भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या नात्यात आलेल्या दुराव्याच्या बातम्या मागील अनेक दिवसांपासून सुरू होत्या. धनश्रीने सोशल अकाऊंटवरून चहलचे नाव हटवल्याच्या अफवेपासून ही चर्चा सुरू झाली, ते थेट या दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्यापर्यंत पोहोचली. १५ दिवस सोशल मीडियावरील हा तमाशा अन् उलटसुलट बातम्या वाचल्यानंतर चहलने सोशल मीडियावर पोस्ट लिहून या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर धनश्रीनेही एक भली मोठी पोस्ट लिहिली. त्यात दुखापतीमुळे ती सोशल मीडियापासून दूर असल्याचे स्पष्ट होतेय. तिनेही या सर्व वृत्ताचे खंडन केले. २-३ दिवसांपूर्वी दोघांनी एकत्रित एक गमतीशीर व्हिडीओही पोस्ट केला.
या सर्व चर्चा मागे विसरून युजवेंद्र आशिया चषक स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. रोहित व युजवेंद्रची मैत्री ही सर्वश्रूत आहे. त्यामुळेच जेव्हा भारतीय पत्रकार टीम इंडियाच्या सराव सत्रात खेळाडूंशी गप्पा मारायला पोहोचले तेव्हा रोहितने संधी साधली. त्याने थेट पत्रकारांना युजवेंद्र व धनश्री यांच्या नात्याबाबतची अफवा कुणी पसरवली असा प्रश्न विचारला. त्यावेळी युजवेंद्रही तेथे उपस्थित होता. रोहितच्या या अनपेक्षित प्रश्नाने उपस्थित पत्रकार गोंधळले अन्...