Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू यूएईला रवाना, Virat Kohliच्या फ़ॉर्मवर सर्वांच्या नजरा

India Squad Asia Cup 2022 : भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी यूएईसाठी रवाना झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 01:06 PM2022-08-23T13:06:57+5:302022-08-23T13:15:18+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2022 : Rohit Sharma, Virat Kohli and Indian team leaves for DUBAI | Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू यूएईला रवाना, Virat Kohliच्या फ़ॉर्मवर सर्वांच्या नजरा

Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू यूएईला रवाना, Virat Kohliच्या फ़ॉर्मवर सर्वांच्या नजरा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Squad Asia Cup 2022 : भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी यूएईसाठी रवाना झाला आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा (Rahul Dravid)  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे तो  संघासोबत आजतरी रवाना झालेला नाही. पण, कोरोनाची सौम्य लक्षण त्यात दिसत आहेत आणि रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो यूएईला रवाना होईल, असे BCCI ने स्पष्ट केले. रोहित शर्मा, विराट कोहली व भारताचे अन्य खेळाडू मुंबई विमानतळावर यूएईसाठी रवाना होतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. पाकिस्तानचा संघ आधीच यूएईत दाखल झाला आहे.

जसप्रीत बुमराहने दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानसोबतच होणार आहे.  झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या संघातील लोकेश राहुल, अक्षर पटेल, आवेश खान, दीपक हुडा हे बुधवारी थेट दुबईत दाखल होतील.  पाकिस्तानचाही प्रमुख गोलंदाज शाहिन आफ्रिदीही दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेत खेळणार नाही.


भारतीय संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग, आवेश खान ( India Asia Cup squad: Rohit Sharma (Captain), KL Rahul (vice-captain), Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, Rishabh Pant (wicket-keeper), Dinesh Karthik (wicket-keeper), Hardik Pandya, Ravindra Jadeja, R. Ashwin, Yuzvendra Chahal, Ravi Bishnoi, Bhuvneshwar Kumar, Arshdeep Singh, Avesh Khan.)

राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल ( Standby: Shreyas Iyer, Deepak Chahar, Axar Patel) 

Web Title: Asia Cup 2022 : Rohit Sharma, Virat Kohli and Indian team leaves for DUBAI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.