Asia Cup 2022 Schedule : Breaking - आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या India vs Pakistan सामना कधी होणार

Asia Cup 2022  Schedule - २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत यूएई येथे होणाऱ्या या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याची सर्वांना उत्सुकता होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 04:45 PM2022-08-02T16:45:42+5:302022-08-02T16:53:05+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2022  Schedule - India will take on Pakistan on August 28th, Sunday in Asia Cup 2022, Full Time Table  | Asia Cup 2022 Schedule : Breaking - आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या India vs Pakistan सामना कधी होणार

Asia Cup 2022 Schedule : Breaking - आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या India vs Pakistan सामना कधी होणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2022  Schedule - आशिया चषक स्पर्धा २०२२चे  वेळापत्रक मंगळवारी  जाहीर करण्यात आले आहे.  २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत यूएई येथे होणाऱ्या या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याची सर्वांना उत्सुकता होती. सुरुवातीला ही स्पर्धा श्रीलंकेत होणार होती, परंतु तेथील राजकिय परिस्थिती लक्षात घेता ही संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. 

१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. पाच जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आमि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक
२७ ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
२८ ऑगस्ट- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
३० ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, शाहजाह  ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
३१ ऑगस्ट - भारत विरुद्ध क्वालिफायर, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
१ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, शाहजाह  ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
३ सप्टेंबर - B1 विरुद्ध B2, Super 4, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
४ सप्टेंबर - A1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
६ सप्टेंबर - A1 विरुद्ध B1, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
७ सप्टेंबर - A2 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
८ सप्टेंबर- A1 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
९ सप्टेंबर - B1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)
११ सप्टेंबर - अंतिम सामना, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)

Web Title: Asia Cup 2022  Schedule - India will take on Pakistan on August 28th, Sunday in Asia Cup 2022, Full Time Table 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.