Join us  

Asia Cup 2022: "मी विराटची फलंदाजी पाहत होतो पण...", शाहिद आफ्रिदीने सूर्यकुमारबद्दल केले मोठे विधान

पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीचे कौतुक केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 4:14 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या सर्वत्र आशिया चषकाची (Asia Cup 2022) चर्चा रंगली आहे. अफगाणिस्तान, भारत आणि श्रीलंका या 3 संघानी सुपर-4 फेरी गाठली आहे. तर आज होणाऱ्या हॉंगकॉंग आणि पाकिस्तान यांच्यामधील विजयी संघ सुपर-4 मध्ये प्रवेश करेल. पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) भारतीय खेळाडूंचे विशेष कौतुक केले आहे. हॉंगकॉंगविरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी आपण खूप उत्सुक होतो असे त्याने कबुल केले आहे. तसेच सामनावीर सूर्यकुमार यादवची ताबडतोब फलंदाजी पाहून मला धक्का बसला, असे आफ्रिदीने अधिक म्हटले. 

दरम्यान, सूर्यकुमार यादवने हॉंगकॉंगविरूद्धच्या सामन्यात शानदार खेळी केली होती. अवघ्या 26 चेंडूंत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या जोरावर त्याने 68 धावांची अर्धशतकी खेळी करून प्रतिस्पर्धी संघाला तगडे आव्हान दिले. सूर्याच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकात 2 बाद 192 एवढ्या धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात हॉंगकॉंगचा संघ केवळ 152 धावा करू शकला आणि भारताने 40 धावांनी विजय मिळवला. 

विराटला धावा करण्यासाठी वेळ लागलाशाहिद आफ्रिदीने समा टीव्हीशी संवाद साधताना म्हटले, "मला थोडा वेळ मिळाला त्यामध्ये मी भारताचा सामना पाहिला. मी विराटची फलंदाजी पाहत बसलो होतो. त्याला धावा करण्यासाठी खूप वेळ लागत होता. हे त्याच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे त्याला देखील माहीत असून विराटला अशाच कामगिरीची गरज आहे. प्रतिस्पर्धी संघ कोणताही असला तरी त्याला पुढे जाण्यासाठी अशा खेळीची गरज आहे त्यामुळे आत्मविश्वास मिळेल."

सूर्याकडे सकारात्मक मानसिकताविराट खूप धीम्या गतीने खेळत राहिला मात्र ज्यापद्धतीने सूर्यकुमारने खेळी करायला सुरूवात केली. सूर्यकुमार यादवची आक्रमक फलंदाजी पाहून मला धक्काच बसला. त्याने पहिल्याच चेंडूंवर चौकार ठोकला, तो सकारात्मक मानसिकतेतून आला होता. तो ठरवूनच आला होता की मला कोणत्याही चेंडूंवर मोठे फटकार मारायचे आहेत", अशा शब्दांत आफ्रिदीने सूर्यकुमारच्या खेळीचे कौतुक केले. 

 

टॅग्स :एशिया कप 2022शाहिद अफ्रिदीविराट कोहलीसूर्यकुमार अशोक यादवभारतीय क्रिकेट संघ
Open in App