Asia Cup 2022, Sri Lanka vs Afghanistan : आशिया चषक २०२२च्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी कमाल केली आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने माजी विजेत्या श्रीलंकेची अवस्था वाईट केली आहे. श्रीलंकेचा निम्मा संघ ६० धावांत माघारी परतला आहे, परंतु
कुसल मेंडिस व पथुम निसंका ही जोडी सलामीला आली, परंतु फझलहक फारूकीने पाचव्याच चेंडूवर धक्का दिला. मेंडीस २ धावांवर पायचीत झाला. पुढच्याच चेंडूवर चरिथ असलंकालाही ( ०) पायचीत करून फारुकीने श्रीलंकेची अवस्था २ बाद ३ अशी केली. मैदानावरील अम्पायरने नाबाद दिल्यानंतर DRS घेतला गेला अन् ही विकेट मिळाली. पुढच्या षटकात नवीन-उल-हकने आणखी एक धक्का देताना पथुम निसंकाला ( ३) झेलबाद केले. चेंडू बॅटची हलकी किनार घेत यष्टिरक्षकाच्या हाती विसावला अन् जोरदार अपील केल्या आणि अम्पायरने बोट वर केलं. श्रीलंकेच्या फलंदाजाने DRS घेतला, परंतु तिसऱ्या अम्पायरने हलक्याशा अल्ट्राएजच्या बळावर बाद हा निर्णय कायम राखला. दोन षटकांत श्रीलंकेची अवस्था ३ बाद ५ धावा अशी झाली. निसंकाला बाद दिल्याच्या निर्णयाने वाद होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचे खेळाडू नाराज दिसले.
दनुष्का गुणथिलका व भानुका राजपक्षा यांनी श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. गुणथिलकाला अझमतुल्लाह ओमारजाईने झेल सोडून जीवदान दिले. पण, त्याचा फार फटका बसला नाही. मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात गुणथिलका ( १७) करीम जनतच्या हाती झेलबाद झाला. राजपक्षा व गुणथिलका यांची ३१ चेंडूंत ४४ धावांची भागीदारी तुटली. मुजीबने त्याच्या पुढच्या षटकात श्रीलंकेला आणखी एक धक्का दिला. वनिंदु हसरंगा ( २) झेलबाद होऊन माघारी परतल्याने श्रीलंकेची अवस्था ५ बाद ६० धावा अशी झाली.
Web Title: Asia Cup 2022, SL vs AFG : A bizarre dismissal, ultra edge doesn't show a visible flicker but the third umpire gives it out anyhow! Pathum Nissanka has to walk
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.