Asia Cup 2022, SL vs BAN : बांगलादेशचे फलंदाज पेटून उठले अन् श्रीलंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतले!; तगडे लक्ष्य ठेवले

Asia Cup 2022, Sri Lanka vs Bangladesh : मेहिदी हसन मिराजची दमदार सुरुवात आणि कर्णधार शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan) याच्या विश्वविक्रमी कामगिरीनंतर अफिफ होसैन व महमुदुल्लाह यांनी चांगली फटकेबाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 09:24 PM2022-09-01T21:24:53+5:302022-09-01T21:25:13+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2022, SL vs BAN : angladesh posted 183 for 7 from 20 overs against Sri Lanka in a virtual quarter-final | Asia Cup 2022, SL vs BAN : बांगलादेशचे फलंदाज पेटून उठले अन् श्रीलंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतले!; तगडे लक्ष्य ठेवले

Asia Cup 2022, SL vs BAN : बांगलादेशचे फलंदाज पेटून उठले अन् श्रीलंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतले!; तगडे लक्ष्य ठेवले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2022, Sri Lanka vs Bangladesh : मेहिदी हसन मिराजची दमदार सुरुवात आणि कर्णधार शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan) याच्या विश्वविक्रमी कामगिरीनंतर अफिफ होसैन व महमुदुल्लाह यांनी चांगली फटकेबाजी केली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सामन्याच्या काही टप्प्यात वर्चस्व गाजवले, परंतु बांगलादेशला मोठी धावसंख्या करण्यापासून ते रोखू शकले नाहीत. अखेरच्या पाच षटकांत तर बांगलादेशच्या फलंदाजांनी १३च्या सरासरीने धावा चोपून श्रीलंकेसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. 

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् तिसऱ्याच षटकात त्यांना यश मिळाले. सब्बीर रहमान ( ५) असिथा फर्नांडोने चालते केले. मेहिदी हसन मिराज व कर्णधार शाकिब अल हसन यांनी त्यानंतर बांगलादेशचा डाव सावरला. पण, वनिंदू हसरंगा त्याच्या पहिल्याच षटकात मेहिदी हसनचा ( ३८) त्रिफळा उडवला. मुश्फीकर रहिम ( ४) याला चमिका करुणारत्नेनं बाद करून तिसरा धक्का दिला. महिश थिक्षानाने श्रीलंकेला मोठं यश मिळवून दिलं. त्याने शाकिबचा ( २४) त्रिफळा उडवून बांगलादेशची अवस्था ४ बाद ८७ अशी केली. बांगलादेशने विकेट गमावल्या असल्या तरी त्यांचा धावांचा वेग साडेसातच्या सरासरीने सुरू होता.

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ६०००+ धावा आणि ४००+ विकेट्स घेणारा शाकिब दुसरा खेळाडू ठरला. त्याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३६९ सामन्यांत ६००९ धावा व ४१९ विकेट्स घेतल्या आहेत. विंडीजचा ड्वेन ब्राव्हो ५४९ सामन्यांत ६८७१ धावा व ६०५ विकेट्ससह या विक्रमात अव्वल स्थानी आहे. शाकिबच्या विकेटनंतर अफिफ होसैन व महमुदुल्लाह यांनी दमदार फटकेबाजी केली. या दोघांची भागीदारी श्रीलंकेचं टेंशन वाढवत होतं. या दोघांनी ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. दिशाना मधुशंकाने ही भागीदारी तोडली. होसैन २२ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३९ धावा करून झेलबाद झाला. पुढच्याच षटकात हसरंगाने सेट फलंदाज महमुदुल्लाहला ( २७) बाद केले.  

मेहदी हसन (  १) पायचीत झाला अन् बांगलादेशला पटापट तीन धक्के बसले. पण, बांगलादेशच्या धावांचा वेग मंदावला नाही. त्यांनी जवळपास १३च्या सरासरीने अखेरच्या पाच षटकांत धावा कुटल्या. मोसाडेक होसैन व तस्कीन अहमद यांनी अखेरची षटकं गाजवली. मोसाडेकने अखेरच्या षटकात खणखणीत फटकेबाजी करून संघाला ७ बाद १८३ धावांपर्यंत मजल मारून दिली. मोसाडेक ९ चेंडूंत २४ धावांवर नाबाद राहिला, तर तस्कीनने ११ धावा केल्या. 
 

Web Title: Asia Cup 2022, SL vs BAN : angladesh posted 183 for 7 from 20 overs against Sri Lanka in a virtual quarter-final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.