Asia Cup 2022, SL vs BAN : No Ball ने श्रीलंकेचा विजय पक्का केला, Super 4 मध्ये धडक मारून खेळाडूंनी 'नागिन डान्स' केला

Asia Cup 2022, Sri Lanka vs Bangladesh : बांगलादेश व श्रीलंका यांच्यातला ब गटातील अखेरचा साखळी सामना चुरशीचा झाला. दोन्ही संघांना अफगाणिस्तानकडून हार  मानावी लागली होती आणि त्यामुळे आशिया चषक २०२२मधील आव्हान कायम राखण्यासाठी दोघांनाही विजय महत्त्वाचा होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 11:25 PM2022-09-01T23:25:54+5:302022-09-01T23:28:47+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2022, SL vs BAN : Sri Lanka qualified for the Super 4, beat Bangladesh by 2 wickets, This is the highest successful chase ever in Asia Cup T20 history | Asia Cup 2022, SL vs BAN : No Ball ने श्रीलंकेचा विजय पक्का केला, Super 4 मध्ये धडक मारून खेळाडूंनी 'नागिन डान्स' केला

Asia Cup 2022, SL vs BAN : No Ball ने श्रीलंकेचा विजय पक्का केला, Super 4 मध्ये धडक मारून खेळाडूंनी 'नागिन डान्स' केला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2022, Sri Lanka vs Bangladesh : बांगलादेशश्रीलंका यांच्यातला ब गटातील अखेरचा साखळी सामना चुरशीचा झाला. दोन्ही संघांना अफगाणिस्तानकडून हार  मानावी लागली होती आणि त्यामुळे आशिया चषक २०२२मधील आव्हान कायम राखण्यासाठी दोघांनाही विजय महत्त्वाचा होता. बांगलादेशने १८४ धावांचे तगडे लक्ष्य उभे केले आणि त्याला श्रीलंकेच्या फलंदाजांकडून सडेतोड उत्तर मिळाले. मात्र, बांगलादेशच्या गोलंदाजांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. इबादत होसैनने टाकलेले १९ वे षटक कलाटणी देणारे ठरले. त्यात षटकांची मर्यादा संथ राखल्याने अखेरच्या षटकात बांगलादेशला ५ खेळाडू ३० यार्ड सर्कलच्या आत उभे करावे लागले. त्याचा श्रीलंकेने फायदा उचलला.

सब्बीर रहमान ( ५) लगेच माघारी परतल्यानंतर मेहिदी हसन मिराज ( ३८) व कर्णधार शाकिब अल हसन यांनी डाव सावरला. मुश्फीकर रहिम ( ४) याला चमिका करुणारत्नेनं बाद करून तिसरा धक्का दिला. शाकिबचा ( २४) त्रिफळा उडाला. शाकिबच्या विकेटनंतर अफिफ होसैन व महमुदुल्लाह यांनी दमदार फटकेबाजी केली. त्यांनी ५७ धावांची भागीदारी पूर्ण केली. होसैन ३९ धावांवर, तर महमुदुल्लाहला ( २७) बाद झाला. मेहदी हसन (  १) पायचीत झाला अन् बांगलादेशला पटापट तीन धक्के बसले. पण, बांगलादेशच्या धावांचा वेग मंदावला नाही. त्यांनी जवळपास १३च्या सरासरीने अखेरच्या पाच षटकांत धावा कुटल्या. मोसाडेक होसैन व तस्कीन अहमद यांनी अखेरची षटकं गाजवली. मोसाडेकने अखेरच्या षटकात खणखणीत फटकेबाजी करून संघाला ७ बाद १८३ धावांपर्यंत मजल मारून दिली. मोसाडेक ९ चेंडूंत २४ धावांवर नाबाद राहिला, तर तस्कीनने ११ धावा केल्या. 


पथूम निसंका व कुसल मेंडिस यांनी श्रीलंकेला आश्वासक सुरुवात करून दिली. पहिल्या दोन षटकांत त्यांनी ३१ धावा चोपल्या. पण, ४५ धावांची ही भागीदारी पदार्पणवीर इबादत होसैनने तोडली. त्याने निसंकाची ( २०) विकेट घेत  श्रीलंकेला पहिला धक्का दिला. त्याच षटकात इबादतने चरिथ असलंकाची ( १) विकेट घेतली. पदार्पणाच्या पहिल्याच षटकात ४ धावा देताना इबादतने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. धनुष्का गुणतिलका ( ११) यालाही इबादतने माघारी पाठवून श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले. भानुका राजपक्षा ( २) धावबाद झाल्याने श्रीलंकेची अवस्था ४ बाद ७७ अशी झाली. कुसल मेंडिसला आज नशीब साथ देताना दिसले. कुसलने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.


कुसल मेंडिसचा दुसऱ्याच षटकात मुश्फीकर रहीमने झेल सोडला, महेदी हसनच्या गोलंदाजीवर मुश्फीकरने झेल घेतला, परंतु तो नो बॉल ठरला. इबादत होसैनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाने झेल टिपला, परंतु बांगलादेशने DRS न घेतल्याने कुसलला आणखी एक जीवदान मिळाले. त्याला रन आऊट करण्याची संधीही गमावली. १५व्या षटकात अखेर मेंडिसला बाद करण्यात बांगलादेशला यश आले. मुस्ताफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर तस्कीन अहमदने झेल घेतला. मेंडिसने ३७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा केल्या. श्रीलंकेला आता ३० चेंडूंत ४७ धावांची गरज होती आणि वनिंदू हसरंगा व कर्णधार दासून शनाका खेळपट्टीवर होते. पण, वनिंदू २ धावांवर तस्कीनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. 


शनाकावर सर्व भिस्त होती आणि नशीबही त्याला साथ देताना दिसले. १८ चेंडूंत ३४ धावा श्रीलंकेना बनवायच्या होत्या. बांगलादेशच्या फिरकीपटूंची दोन षटकं शिल्लक होती. महेदी हसनच्या १८व्या षटकाच्या पहिल्या पाच चेंडूंवर ८ धावा आल्या, अखेरच्या चेंडूवर शनाकाने मोठा फटका मारला, परंतु मोसाडेक होसैनने सीमारेषेवर झेल टिपला. शनाका ३३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४५ धावांवर माघारी परतला. १९व्या षटकात इबादत गोलंदाजीला आला, परंतु त्याच्या पायात क्रँप आला. चमिका करुणारत्नेनं चतुर फलंदाजी करताना इबादतच्या पहिल्या ३ चेंडूंवर ११ धावा काढल्या. त्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर शाकिबने अचूक थ्रो करून चमिकाला ( १६) रन आऊट केले. ३ विकेट्स घेणाऱ्या इबादतच्या त्या षटकात १७ धावा आल्याने श्रीलंकेला ६ चेंडूत ८ धावाच करायच्या होत्या. 

२० व्या षटकात पहिल्या चेंडूवर लेग बाय १ धाव मिळाली. त्यानंतर चौकार गेला अन तिसऱ्या चेंडूवर २ धावा पळून काढताना श्रीलंकेने १८३ धावांची बरोबरी केली. तो चेंडू No Ball ठरला अन् श्रीलंकेच्या धावसंख्येत एक अतिरिक्त धाव जोडली गेली अन् त्यांचा विजयही पक्का झाला. आशिया चषक स्पर्धेतील ही सर्वोत्तम धावांचा पाठलाग करणारी कामगिरी ठरली. श्रीलंकेच्या खेळाडूंनी विजयानंतर नागिन डान्स केला. 

Web Title: Asia Cup 2022, SL vs BAN : Sri Lanka qualified for the Super 4, beat Bangladesh by 2 wickets, This is the highest successful chase ever in Asia Cup T20 history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.