नवी दिल्ली : यूएईच्या धरतीवर आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. आशिया चषकात प्रथमच सहभागी झालेल्या हॉंगकॉंगच्या (Hong Kong) संघाने आपल्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाला चांगलीच टक्कर दिली. पात्रता फेरी गाठून हॉंगकॉंगच्या संघाने इथपर्यंत मजल मारली आहे, या संघाने अनेक भारत-पाकिस्तान वंशाचे खेळाडू आहेत, संघाचा कर्णधार निजाकत खान पाकिस्तानी वंशाचा आहे. लक्षणीय बाब म्हणजे हॉंगकॉंगच्या संघात अनेक असे खेळाडू आहेत जे सामान्य कुटुंबातून आले आहेत. काही डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात तर काहींनी व्यावसायिक म्हणून काम करून मोठ्या व्यासपीठावर नाव कमावले आहे.
छोटा-मोठा व्यवसाय करून केले संघाचे नेतृत्व दरम्यान, संघातील फलंदाज किंचित शाह सामान्यत: कौटुंबिक हिऱ्यांचा व्यवसाय हाताळतो. त्याने भारताविरूद्धच्या सामन्यात 2 चौकार आणि 1 षटकार ठोकून 30 धावांची खेळी केली होती. बुधवारचा सामना झाल्यानंतर आपल्या प्रियसीला प्रपोज करणारा मुंबईत जन्मलेला संघाचा उपकर्णधार पिझ्झा डिलिव्हरीचे काम पाहतो. तीनही पात्रता सामने जिंकून सहा देशांच्या आशिया चषक स्पर्धेमध्ये स्थान मिळवण्याचा हॉंगकॉंगच्या संघाचा प्रवास खूप कठीण होता.
हॉंगकॉंगचा स्पर्धेतील दुसरा सामना आज पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. पाकिस्तानी वंशाचा निजाकत खान हॉंगकॉंगच्या संघाचे नेतृत्व करत आहे. आजच्या सामन्यातील विजयी संघ सुपर-4 फेरी गाठेल आणि त्यांचा सामना रविवारी भारताविरूद्ध खेळवला जाईल. "आम्हाला हॉंगकॉंगकडून खूप पाठिंबा मिळत आहे, भारत आणि पाकिस्तान या संघाविरूद्ध खेळल्याने आम्हाला खूप काही शिकता येणार आहे", असे निजाकत खानने म्हटले.
हॉंगकॉंगच्या खेळाडूंनी जिंकली मनंहाँगकाँगच्या संघाचे मीडिया मॅनेजर स्मिता छेत्री यांनी म्हटले, "हॉंगकॉंगच्या संघातील खेळाडू बाबर हयात, एहसान खान आणि यासीम मुर्तझा हे नुकतेच वडील झाले आहेत, परंतु आशिया चषकामुळे त्यांनी फक्त व्हिडीओ कॉलवरून आपल्या नवजात मुलांना पाहिले आहे. आमचे काही खेळाडू डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहेत, तर काहीजण शिक्षक म्हणून नोकरी करत आहे.