India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight : भारतीय संघाला आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या सुपर ४ च्या लढतीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. रोहर्षक सामन्यात पाकिस्तानने ५ विकेट्स राखून बाजी मारताना अंतिम फेरीच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. भारताच्या १८१ धावांचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाज या जोडीने तुफान फटकेबाजी केली. भारताकडून झालेल्या ४ चुकांचा पाकिस्तानला फायदा झाला अन् त्यांनी हा सामना जिंकला.
Asia Cup 2022 : उपांत्य फेरीचे सामने नाही होणार, मग फायनलचे दोन संघ कसे ठरणार?; जाणून घ्या Super 4 चे समीकरण
रोहित शर्मा ( २८) व लोकेश राहुल ( २८ ) यांनी ४.२ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या. सूर्यकुमार यादव ( १३) व विराट कोहलीने २९ धावांची भागीदारी केली. रिषभ पंतने ( १४) आज मोठी खेळी करण्याची संधी गमावली. हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला. दीपक हुडाने ( १६) विराटसह २४ चेंडूंत ३७ धावांची भागीदारी केली. रवी बिश्नोईने अखेरच्या दोन चेंडूंवर चौकार खेचून भारताला ७ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारून दिली. विराटने ४४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार मारून ६० धावा चोपल्या. मोहम्मद रिझवान व मोहम्मद नवाज या जोडीने ७३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार व हार्दिक पांड्या यांनी मोक्याच्या क्षणी या दोघांची विकेट घेतली.
रवी बिश्नोईने टाकलेल्या १८व्या षटकात आसीफ अली ( Asif Ali) साठी जोरदार अपील झाले. रिषभ पंतने झेल टिपल्याचा दावा केला अन् रोहितने DRS घेतला. अल्ट्रा एजमध्ये बॉल व बॅटचा संपर्क झाल्याचे दिसले, परंतु तिसऱ्या अम्पायरने नाबाद दिले. अर्षदीप सिंगने सोपा झेल सोडला अन् तिथेच भारताच्या हातून सामनाही पूर्णपणे गेला. मोहम्मद रिझवानने ५१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ७१ धावा केल्या. मोहम्मद नवाज २० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ४२ धावा कुटून गेला. खुशदील शाह ( १४*) व आसीफ अली ( १६) यांचे अखेरच्या षटकांतील योगदान महत्त्वाचे ठरले.
भारताच्या पराभवाची ४ कारणं...
- रिषभ पंत व दीपक हुडा यांची खराब फलंदाजी
- हार्दिक पांड्यासाठी आजचा दिवस ठरला निराशाजन
- आसीफ अलीचा १८व्या षटकात अर्षदीप सिंगने सोडलेला झेल
- भुवनेश्वर कुमारने १९व्या षटकात दिलेल्या १९ धावा
Web Title: Asia Cup 2022 super 4 IND vs PAK : Rohit Sharma lost his cool on arshdeep singh after he dropped asif ali catch, know the Reasons behind India's defeat, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.