Join us  

Asia Cup 2022: आशिया चषकाची फायनल पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान अन्...!; माजी कर्णधाराचा मोठा दावा 

पाकिस्तान Super 4 मध्ये जागा मिळवणारा चौथा संघ ठरला. पाकिस्तानच्या आजच्या विजयाने पुन्हा India vs Pakistan यांचा महा मुकाबला सेट झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 7:44 AM

Open in App

Asia Cup 2022 SUPER-4 Schedule India vs Pakistan : पाकिस्तान संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेत अखेर विजय मिळवून सुपर ४ मध्ये प्रवेश केला.  श्रीलंकेने गुरुवारी बांगलादेशवर थरारक विजय मिळवून सुपर ४ मध्ये एन्ट्री मारली होती. पाकिस्तान Super 4 मध्ये जागा मिळवणारा चौथा संघ ठरला. पाकिस्तानच्या आजच्या विजयाने पुन्हा India vs Pakistan यांचा महा मुकाबला सेट झाला. येत्या रविवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुन्हा पाकिस्तानला भिडणार आहे. हे दोन संघ आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्येही भिडतील अशी क्रिकेट चाहत्यांना आशा आहे. पण, इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन ( Nasir Hussain) याचे मत काही वेगळे आहे.

भारताने आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला होता. हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरी करताना विजयी षटकार खेचला होता. त्याने त्या सामन्यात ३ विकेट्स व नाबाद ३३ धावा केल्या होत्या. भुवनेश्वर कुमारने चार विकेट्स घेतल्य, तर रवींद्र जडेजाने संयमी खेळ करताना भारताचा डाव सावरला होता. पण, आता रवींद्र जडेजाने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे आणि त्याच्याजागी दीपक हुडा किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकले. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात विश्रांती घेऊन हार्दिक पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. पाकिस्तानचे १५५ धावांनी विजय मिळवून मनोबल उंचावले आहे. त्यामुळे रविवारी ४ सप्टेंबरला कट्टर मॅच पाहायला मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

अफगाणिस्तान व भारताने दोन सामने जिंकून सुपर ४ मध्ये प्रवेश केला. अफगाणिस्तानने ब गटात श्रीलंका व बांगलादेश यांच्यावर सहज विजय मिळवला आहे. नासिर हुसैनच्या म्हणण्यानुसार, आशिया चषक स्पर्धेची फायनल ही पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान अशी होईल आणि जेतेपद अफगाणिस्तान पटकावेल. 

Super 4 चे वेळापत्रक

  • ३ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
  • ४ सप्टेंबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
  • ६ सप्टेंबर - भारत विरुद्ध श्रीलंका, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
  • ७ सप्टेंबर- अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
  • ८ सप्टेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
  • ९ सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
  • ११ सप्टेंबर- फायनल, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून, दुबई 
टॅग्स :एशिया कप 2022अफगाणिस्तानपाकिस्तान
Open in App