Asia Cup 2022 SUPER-4 Schedule India vs Pakistan : पाकिस्तान संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेत अखेर विजय मिळवून आव्हान कायम राखले. भारताकडून पराभूत झालेले पाकिस्तान व हाँगकाँग हे दोन संघ आज मैदानावर उतरले. पण, बाबर आजमच्या संघाने विजय मिळवून सुपर ४ मधील आपले स्थान पक्के केले. श्रीलंकेने गुरुवारी बांगलादेशवर थरारक विजय मिळवून सुपर ४ मध्ये एन्ट्री मारली होती. पाकिस्तान Super 4 मध्ये जागा मिळवणारा चौथा संघ ठरला. पाकिस्तानच्या आजच्या विजयाने पुन्हा India vs Pakistan यांचा महा मुकाबला सेट झाला. येत्या रविवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुन्हा पाकिस्तानला भिडणार आहे.
भारताने आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला होता. हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरी करताना विजयी षटकार खेचला होता. त्याने त्या सामन्यात ३ विकेट्स व नाबाद ३३ धावा केल्या होत्या. भुवनेश्वर कुमारने चार विकेट्स घेतल्य, तर रवींद्र जडेजाने संयमी खेळ करताना भारताचा डाव सावरला होता. पण, आता रवींद्र जडेजाने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे आणि त्याच्याजागी दीपक हुडा किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकले. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात विश्रांती घेऊन हार्दिक पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.
Super 4 चे वेळापत्रक
- ३ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
- ४ सप्टेंबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
- ६ सप्टेंबर - भारत विरुद्ध श्रीलंका, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
- ७ सप्टेंबर- अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
- ८ सप्टेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
- ९ सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
- ११ सप्टेंबर- फायनल, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून, दुबई