नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. आज भारत विरूद्ध हॉंगकॉंग (IND vs HK) असा सामना होणार असून भारतीय संघ सुपर-४ मध्ये स्थान मिळवण्यासाठी मैदानात उतरेल. पात्रता फेरीतून स्पर्धेत पोहोचलेल्या हॉंगकॉंगच्या संघाचे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी विशेष नाते आहे. खरं तर आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या या संघात बहुतांश खेळाडू भारत आणि पाकिस्तानी वंशाचे आहेत. हॉंगकॉंगच्या संघाने पात्रता फेरीत शानदार खेळी केली आणि सलग तीन सामने जिंकून ग्रुप ए मध्ये आपले स्थान निश्चित केले.
दरम्यान, क्रिकेट हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये खूप लोकप्रिय असलेला खेळ आहे, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अलीकडच्या काळात हाँगकाँग, यूएई आणि सिंगापूरसारख्या आशियाई देशांमध्ये क्रिकेट खेळण्याचा ट्रेंड वाढला आहे. अशा परिस्थितीत अनेक भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडू मोठ्या व्यासपीठावर खेळण्यासाठी या देशांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात.
हॉंगकॉंगच्या संघात पाकिस्तानी खेळाडूंचा वावर
साहजिकच अशा देशांसोबत खेळल्याने खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख पटवून देण्याची संधी मिळते. तसेच एक क्रिकेटपटू म्हणून एखाद्या खेळाडूला जगभरात आयोजित लीग क्रिकेटमध्ये खेळण्याची संधीही मिळू शकते. झिम्बाब्वेमध्ये भारताविरुद्ध शतक झळकावून प्रसिद्धीच्या झोतात आलेला सिकंदर रझा देखील मूळचा पाकिस्तानातील सियालकोटचा रहिवासी आहे.
लक्षणीय बाब म्हणजे हॉंगकॉंगच्या संघाचा कर्णधार निझाकत अली आणि सलामीवीर फलंदाज यासीम मोर्तझा हे दोघेही मूळचे पाकिस्तानचे आहेत. मुर्तझा हा सियालकोटचा तर अली हा पाकिस्तानच्या चॉंद या शहरातील आहे. बाबर हयात हा हाँगकाँगच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा चेहरा असून तो पाकिस्तानातील अटॉक शहराचा रहिवासी आहे.
आशिया चषकासाठी हॉंगकॉंगचा संघ-
निझाकत खान (कर्णधार), यासीम मुर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅककेनी, जीशान अली, हारून अर्शद, एहसान खान, मोहम्मद गझनफर, आयुष शुक्ला, वाजिद शाह, आफताब हुसैन, धनंजय राव, मोहम्मद वाहीद, अहान त्रिवेदी, अतीक इक्बाल.
Web Title: Asia Cup 2022 Today will be IND vs PAK, not India vs Hong Kong, know here reason
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.