Join us  

Virat Kohli: "एका पिढीला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद", हॉंगकॉंगच्या संघाने किंग कोहलीला दिली खास भेट

आशिया चषकात सलग दुसरा विजय मिळवून भारतीय संघाने सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2022 3:24 PM

Open in App

नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) सलग दुसरा विजय मिळवून भारतीय संघाने सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे.  ग्रुप ए आणि ग्रुप बी मधील प्रत्येकी 1-1 संघाने सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला आहे. ग्रुप ए मधून भारताने तर ग्रुप बी मधून अफगाणिस्तानने सुपर-4 मध्ये प्रवेश निश्चित केला आहे. भारतीय संघाने बुधवारी हॉंगकॉंगला पराभूत करून ही किमया साधली आहे. के.एल राहुल व विराट कोहली हे फॉर्माशी झगडणारे फलंदाज हे चांगले खेळले. विराट कोहलीने मोठ्या कालावधीनंतर अर्धशतकी खेळी केली. दरम्यान, सामन्यानंतर हॉंगकॉंगच्या संघाने विराट कोहलीला एक खास भेट दिली आहे. 

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने मोठ्या कालावधीनंतर अर्धशतकी खेळी केली. कर्णधार रोहित शर्मा वगळता प्रत्येक फलंदाजाला साजेशी खेळी करण्यात यश आले. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने हॉंगकॉंगसमोर धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर के.एल राहुलने 39 चेंडूंत 36 धावांची संयमी खेळी करून भारताला चांगली सुरूवात करून दिली. मात्र सूर्यकुमार यादवने अवघ्या 26 चेंडूंत 68 धावांची वादळी खेळी केली, ज्यामध्ये 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. 

विराट कोहलीला हॉंगकॉंगच्या संघाने त्यांच्या जर्सीवर एक मेसेज लिहून खास भेट दिली आहे. "एका पिढीला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुझ्या नेहमी पाठीशी उभे आहोत. पुढे अनेक अविश्वसनीय दिवस असतील. पूर्ण ताकदीने आणि प्रेमाने हॉंगकॉंगचा संघ तुझ्यासोबत आहे", अशा शब्दांत हॉंगकॉंगच्या संघाने किंग कोहलीचे अभिनंदन केले आहे. हॉंगकॉंगने दिलेल्या खास भेटीचा स्क्रीनशॉट विराट कोहलीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम प्रोफाइलवर पोस्ट केला आणि लिहिले, "धन्यवाद @hkcricket. हे खरोखरच नम्र आणि खूप गोड आहे."

भारताचा दणदणीत विजयहॉंगकॉंगच्या संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. सुरूवातीला भारतीय फलंदाजांनी संयमी खेळी करून डाव पुढे नेला. हॉंगकॉंगच्या गोलंदाजांची गती अतिशय धीमी असल्यामुळे रोहित, विराटसह के.एल राहुल यांना मोठे फटकेबाजी करण्यास अडथळा येत होता. मात्र अखेरच्या काही षटकांमध्ये विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने शानदार खेळी करून हॉंगकॉंगसमोर तगडे आव्हान उभे केले. सूर्यकुमार यादवने 26 चेंडूंत 68 धावांची ताबडतोब खेळी करून हॉंगकॉंगच्या गोलंदाजांना घाम फोडला.  तर विराट 44 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 59 धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी 42 चेंडूंत 98 धावांची भागीदारी केली. अखेर भारताने 40 धावांनी सामना आपल्या नावावर केला. 

 

टॅग्स :एशिया कप 2022विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ
Open in App