Asia Cup 2023, AFG vs SL : श्रीलंकेचे सिंह उशीरा पण योग्यवेळी जागे झाल्याचे दिसतेय... आशिया चषक २०२२ च्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानकडून हार मिळाल्यानंतर श्रीलंकेने बांगलादेशवर थरारक विजय मिळवला. त्यानंतर सुपर ४च्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत केले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अखेरच्या ५ षटकांत केलेले कमबॅक हे सामन्याला कलाटणी देणारे ठरले. त्यामुळे अफगाणिस्तानच्या धावांना वेसण घातली गेली अन् श्रीलंकेसमोर मोठे लक्ष्य उभं करता आले नाही. श्रीलंकेने ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला. शाहजाह क्रिकेट मैदानावरील ट्वेंटी-२० क्रिकेटमधील हा सर्वोत्तम धावांचा यशस्वी पाठलाग ठरला. पण, या सामन्यात वादाची ठिणगी पडली. राशिद खान व दानुष्का गुणतिलके यांच्यात बाचाबाची झालेली पाहायला मिळाली.
रहमनुल्लाह गुर्बाजने ४५ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ८४ धावा केल्या, तर इब्राहिम झाद्रानने ४० धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. पण, अफगाणिस्तानला अखेरच्या ५ षटकांत ३७ धावा करता आल्या आणि ५ विकेट्स गमावल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला ६ बाद १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात पथूम निसंका ( ३५) व कुसल मेंडीस ( ३६) यांनी चांगली सुरुवात करून दिली. दानुष्का गुणतिलके ( ३३) व भानुका राजपक्षा ( ३१) यांनी दमदार खेळ करून श्रीलंकेचा विजय पक्का केला. वनिंदू हसरंगाने १६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
या सामन्याच्या १७व्या षटकात राशिदच्या गोलंदाजीवर दनुष्काने रिव्हर्स स्वीप मारून चौकार मिळवला. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. राशिदने अपशब्दही वापरल्याचे व्हिडीओत दिसतेय.
Web Title: Asia Cup 2023, AFG vs SL : Rashid Khan, Danushka Gunathilaka engage in heated fight during Sri Lanka vs Afghanistan clash, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.