Asia Cup 2023 Bangladesh Squad Announced: आशियातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आशिया कप 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित केला जात असला तरी तो ODI फॉरमॅटमध्ये हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित केला जात आहे. 4 सामने पाकिस्तानात आणि 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथमच पात्र ठरलेल्या नेपाळचा सलामीचा सामना पाकिस्तानशी होणार आहे, तर अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्ताननंतर आता बांगलादेशकडूनही संघ जाहीर करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, २ वर्षांची क्रिकेटबंदीची शिक्षा भोगून आलेला खेळाडू या संघाचा कर्णधार असणार आहे.
अनुभवी अष्टपैलू खेळाडू बनला कर्णधार
बांगलादेशने आशिया कप 2023 साठी आपला संघ जाहीर केला आहे. बांगलादेशचा वनडे कर्णधार तमीम इक्बालने दुखापतीमुळे काही दिवसांपूर्वी आशिया चषकातून आपले नाव मागे घेतले होते. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 36 वर्षीय अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनकडे कर्णधारपद सोपवले आहे. शाकिब अल हसन आता बांगलादेशचा तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनला आहे आणि आशिया चषकानंतर तो एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही बांगलादेश संघाचे नेतृत्व करेल. मैदानात पंचांशी वाद आणि आक्षेपार्ह वर्तणुकीमुळे शाकीबला दोन वर्षांच्या क्रिकेटबंदीची शिक्षा झाली होती.
आशिया चषक 2023 आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी शाकिब अल हसनची बांगलादेशचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन म्हणाले, "तमीम इक्बालच्या राजीनाम्यानंतर, कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करण्यासाठी आमच्याकडे शकिब अल हसनपेक्षा चांगला पर्याय नव्हता. तो आगामी दोन्ही मोठ्या स्पर्धांमध्ये कर्णधारपद भूषवणार होता. आम्ही घोषणा करण्यापूर्वी त्याचे मत जाणून घ्यायचे होते. त्याच्या संमतीनंतर आम्ही कर्णधार आणि संघाची घोषणा केली."
शाकिब अल हसन बांगलादेश क्रिकेटमधील सर्वात मोठ्या खेळाडूंपैकी एक आहे. तो सध्या वनडे फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू आहे. शाकिबने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 235 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात 9 शतके आणि 53 अर्धशतकांसह 7211 धावा केल्या आहेत आणि 305 विकेट्स घेतल्या आहेत.
Web Title: Asia Cup 2023 Bangladesh Squad Announced Shakib Al Hasan becomes captain after 2 years cricket ban
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.