तिढा सुटला; Asia Cup 2023 स्पर्धेतील India vs Pakistan सामन्याचे ठिकाण ठरले, ४ संघ पाकिस्तानात खेळणार

Asia Cup 2023, India vs Pakistan : पाकिस्तानी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आशिया चषक २०२३ स्पर्धेचा तिढा अखेर सुटला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 04:15 PM2023-06-11T16:15:42+5:302023-06-11T16:18:10+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2023 deadlock seems to be finally coming to a close, Win-win for BCCI & PCB Pakistan to host 4 games, IND vs PAK in Sri Lanka | तिढा सुटला; Asia Cup 2023 स्पर्धेतील India vs Pakistan सामन्याचे ठिकाण ठरले, ४ संघ पाकिस्तानात खेळणार

तिढा सुटला; Asia Cup 2023 स्पर्धेतील India vs Pakistan सामन्याचे ठिकाण ठरले, ४ संघ पाकिस्तानात खेळणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023, India vs Pakistan : पाकिस्तानी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आशिया चषक २०२३ स्पर्धेचा तिढा अखेर सुटला आहे आणि लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर चार सामने खेळवण्याची परवानगी मिळाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ( PCB) हायब्रिड मॉडेललाही परवानगी मिळाली आहे. त्यानुसार आशिया चषक स्पर्धेतील भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहे. IND vs PAK ही  लढतही श्रीलंकेत होणार आहे. BCCI आणि PCB यांच्यातला वाद मिटल्याने ICC नेही सुटकेचा निश्वास टाकला आहे. पाकिस्ताननेही भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेला येण्याची तयारी दर्शवली आहे.


PTI ने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानात चार सामने होतील. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे पहिल्या टप्प्यात पाकिस्तानात खेळतील, नंतर दुसऱ्या टप्प्यात श्रीलंकेत भारताविरुद्ध सामन्यांसाठी येतील. श्रीलंकेतच फायनल खेळवण्यात येणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या वादामुळे PCB प्रमुख  नजम सेठी यांनी वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्काराची भाषा केली होती. 

 


“परिस्थिती अशी आहे की भारताने येण्यास नकार दिला आहे. आम्हाला आशिया कप सोडावा लागेल. अशा परिस्थितीत आम्ही काय करायला हवं? आम्ही हायब्रिय मॉडेल आयसीसीसमोर मांडला आणि त्यांचा त्याला विरोध नाही. आशिया चषक स्पर्धेत  हा मॉडेल कसा काम करतो याची त्यांना प्रतीक्षा आहे. मी यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही पण मला वाटते की ही वस्तुस्थिती आहे,” असे नजम सेठी म्हणाले.
  

Web Title: Asia Cup 2023 deadlock seems to be finally coming to a close, Win-win for BCCI & PCB Pakistan to host 4 games, IND vs PAK in Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.