Asia Cup 2023 : आगामी आशिया चषक 2023 साठी 17 सदस्यीय भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे असेल. या संघात काही नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, तर अनुभवी खेळाडूंना डावलण्यात आले आहे. यावरुन सोशल मीडियावर संघाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी प्रश्न उपस्थित करणाऱ्या/ टीका करणाऱ्यांना सुनावलं. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एका मुलाखतीत त्यांना रविचंद्रन अश्विनला डावलण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावर गावस्कर संतापले. ते म्हणाले की, जेव्हा जेव्हा संघ निवडला जातो, तेव्हा अशा गोष्टी घडतात. याला का निवडले, त्याला का निवडले नाही, अशे वाद होत राहतात.
जो संघ आता निवडला गेला आहे, तो अंतिम संघ आहे, त्यात बदल होणार नाही. हा आपल्या देशाचा संघ आहे. याची निवड का केली नाही, त्याची निवड का केली नाही, या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. हो, असे अनेक खेळाडू होते ज्यांना संघात संधी मिळू शकली असती, परंतु आता टीम आता तयार झाली आहे. अश्विन किंवा इतर कुणाबद्दल काही बोलू नका. तुम्हाला संघ आवडत नसेल, तर सामना पाहू नका, अशा शब्दात गावस्करांनी टीकाकारांना सुनावलं.
Web Title: Asia Cup 2023: 'Don't watch the match if you don't like the team', Sunil Gavaskar tells critics, watch VIDEO...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.