Join us  

'मी पाकिस्तानात नाही जाणार, PCB ने खोटी माहिती दिली', BCCI सचिव जय शहांचे स्पष्टीकरण

Jay Shah on his Pakistan Visit: आशिया चषकासाठी BCCI सचिव जय शहा पाकिस्तानला जाणाऱ्या असल्याच्या बातम्या पाक मीडियामध्ये येत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 5:59 PM

Open in App

Jay Shah on his Pakistan Visit: आशिया चषक 2023(Asia Cup 2023) च्या यजमानपदावरून अनेक महिन्यांपासून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. डरबनमध्ये ICC च्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर BCCI आणि PCB यांच्यात स्पर्धेच्या आयोजनावरुन सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे. दरम्यान, BCCI सचिव जय शहा आशिया चषक 2023 दरम्यान पाकिस्तानला भेट देणार असल्याच्या बातम्या पाकिस्तानी मीडियामध्ये आल्या होत्या. मात्र, जय शहा यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, अलीकडेच पीसीबीचे नवे अध्यक्ष झका अश्रफ यांनी सांगितले होते की, जय शहा यांना आशिया कप 2023 साठी पाकिस्तानला आमंत्रित केल्यानंतर, बीसीसीआयने त्यांना आयसीसी विश्वचषक 2023 साठी भारतात आमंत्रित केले आहे. पण, अशा आमंत्रणाच्या वृत्ताचे बीसीसीआयच्या अंतर्गत सूत्रांनी खंडन केले.

पाकिस्तानात जाणार नाही: जय शहाबीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बुधवारी मीडियाला सांगितले की, ते पाकिस्तानला जाणार असल्याचे वृत्त खोटे आहे. अशाप्रकारच्या बातम्या पीसीबीकडून जाणूनबुजून पसरवल्या जात आहेत. जय शहा आणि झका अश्रफ यांनी डरबनमध्ये सुरू असलेल्या आयसीसीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली होती. तेव्हापासून पाकिस्तान भेटीच्या बातम्या सुरू झाल्या. 

झका अश्रफ यांची हायब्रीड मॉडेलला संमतीपीसीबीचे नवे अध्यक्ष झका अश्रफ यांनी सुरुवातीला हायब्रीड मॉडेल अंतर्गत आशिया कप आयोजित करण्यास नकार दिला होता. मात्र, आता बीसीसीआय आणि पीसीबीचे या मॉडेलवर एकमत झाले आहे. या मॉडेल अंतर्गत भारत आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. श्रीलंकेत 9 आणि पाकिस्तानमध्ये 4 सामने खेळवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

टॅग्स :जय शाहबीसीसीआयभारतपाकिस्तानएशिया कप 2022
Open in App