विराट-लोकेश यांनी केली धुलाई, पाकिस्तानच्या २ गोलंदाजांची स्पर्धेतून माघार घेण्याची तयारी 

Asia Cup 2023 , IND vs PAK : पाकिस्तानला आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारताविरुद्ध सोमवारी दारुण पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 03:29 PM2023-09-12T15:29:20+5:302023-09-12T15:29:35+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2023 , IND vs PAK : Haris Rauf, Naseem Shah likely to miss remainder of Asia Cup 2023, they have called up Shahnawaz Dahani and Zaman Khan as backups | विराट-लोकेश यांनी केली धुलाई, पाकिस्तानच्या २ गोलंदाजांची स्पर्धेतून माघार घेण्याची तयारी 

विराट-लोकेश यांनी केली धुलाई, पाकिस्तानच्या २ गोलंदाजांची स्पर्धेतून माघार घेण्याची तयारी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023 , IND vs PAK : पाकिस्तानला आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारताविरुद्ध सोमवारी दारुण पराभव पत्करावा लागला. भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला ८ बाद १२८ धावाच करता आल्या अन् त्यांना २२८ धावांनी हार मानावी लागली. भारताचा हा पाकिस्तानवरील सर्वात मोठा विजय ठरला. या पराभवामुळे पाकिस्तानचा अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्गही संकटात सापडला आहे, कारण त्यांचा नेट रन रेट फार पडला आहे. त्यात त्यांना आणखी मोठा धक्का बसल्याचे संकेत मिळत आहेत. 

विराट कोहलीला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार दिल्याने गौतम गंभीर नाराज, सांगितलं कारण


पाकिस्तानने युवा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी आणि जमान खान यांना बॅकअप गोलंदाज म्हणून बोलावले आहे. भारताविरुद्धच्या राखीव दिवशी हॅरिस रौफ आधीच बाहेर गेला होता, कारण त्याच्या स्नायूंना ताण आला होता. त्याचवेळी वेगवान गोलंदाज नसीम शाहच्या खांद्यालाही समस्या निर्माण झाली होती. रौफने राखीव दिवशी एकही षटक टाकले नाही आणि तो व नसीम फलंदाजीलाही न आल्याने ८ वी विकेट पडताच पाकिस्तानला ऑल आऊट जाहीर केले गेले. भारताच्या  डावाच्या ४९व्या षटकात नसीमला मैदान सोडावे लागले. नसीमच्या खांद्याला दुखापत झाली आहे.  


पीसीबी मीडियाने म्हटले आहे की, वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर आलेली आहे आणि त्यामुळे या दोन्ही खेळाडूंबाबत आम्हाला धोका पत्करायचा नाही. आम्हाला जोखीम पत्करायची नाही. हॅरीस आणि नसीम हे वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली राहतील. अशा परिस्थितीत, आता संघ व्यवस्थापनाने दोन्ही खेळाडूंना बदलण्यास ACCला सांगितले आहे कारण दोघेही पुढील ७ दिवसांसाठी बाहेर राहणार आहेत. दहानी आणि जमान यांनी पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे आणि दोघांनी पाकिस्तान सुपर लीगमध्येही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.  

Web Title: Asia Cup 2023 , IND vs PAK : Haris Rauf, Naseem Shah likely to miss remainder of Asia Cup 2023, they have called up Shahnawaz Dahani and Zaman Khan as backups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.