IND vs PAK Live : पाकिस्ताननं भारताला आयती संधी दिली; गिल-रोहितकडून धुलाई होताच अख्तरचं विधान

asia cup 2023, IND vs PAK Live updates : आशिया चषकात आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 04:01 PM2023-09-10T16:01:42+5:302023-09-10T16:02:10+5:30

whatsapp join usJoin us
asia cup 2023, IND vs PAK Live updates After Shubman Gill and Rohit Sharma got off to a good start, Shoaib Akhtar questioned Pakistan captain Babar Azam's decision and said he should have batted first | IND vs PAK Live : पाकिस्ताननं भारताला आयती संधी दिली; गिल-रोहितकडून धुलाई होताच अख्तरचं विधान

IND vs PAK Live : पाकिस्ताननं भारताला आयती संधी दिली; गिल-रोहितकडून धुलाई होताच अख्तरचं विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs PAK Live updates in marathi | कोलंबो : आज आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे. साखळी फेरीतील सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची डोकेदुखी वाढवली होती. पण, शुबमन गिल आणि कर्णधार रोहित शर्माने स्फोटक सुरूवात करताना शाहीन आफ्रिदीसह पाक गोलंदाजांचा समाचार घेतला. पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयावरून पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने प्रश्न उपस्थित केले आहेत.

शोएब म्हणाला की, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला मला माहित नाही. मात्र हा निर्णय ऐकताच मी थक्क झालो. दोन दिवस इथे पाऊसही नाही. त्यामुळे पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करायला हवी होती, कारण मागच्या सामन्यात भारताविरूद्ध बाबरच्या संघाला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. पाकिस्तान अजूनही फेव्हरेट आहे पण त्यांनी भारताला आयती संधी दिली आहे. खरं तर भारतीय सलामीवीरांनी स्फोटक खेळी करून प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकला. ११ षटकांपर्यंत भारतीय संघाने एकही गडी न गमावता ६९ धावा केल्या आहेत. 

सुपर ४ मधील पहिलाच सामना खेळत असलेल्या भारतीय संघात लोकेश राहुलचे पुनरागमन झाले आहे. भारतीय संघ सुपर ४ मधील आपला पहिलाच सामना खेळत आहे, तर यजमान पाकिस्तान बांगलादेशला पराभूत इथपर्यंत पोहचला आहे. या आधी साखळी फेरीत हे कट्टर प्रतिस्पर्धी भिडले होते तेव्हा पावसाच्या कारणास्तव सामना अनिर्णित राहिला अन् दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. 

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघ - 
बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, शादाब खान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान, अलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हारीस रौफ.  

Web Title: asia cup 2023, IND vs PAK Live updates After Shubman Gill and Rohit Sharma got off to a good start, Shoaib Akhtar questioned Pakistan captain Babar Azam's decision and said he should have batted first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.