IND vs PAK Live updates in marathi | कोलंबो : आज आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. सुपर ४ मधील पहिलाच सामना खेळत असलेल्या भारतीय संघात लोकेश राहुलचे पुनरागमन झाले आहे. भारतीय संघ सुपर ४ मधील आपला पहिलाच सामना खेळत आहे, तर यजमान पाकिस्तान बांगलादेशला पराभूत इथपर्यंत पोहचला आहे. या आधी साखळी फेरीत हे कट्टर प्रतिस्पर्धी भिडले होते तेव्हा पावसाच्या कारणास्तव सामना अनिर्णित राहिला अन् दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला.
आज पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात महत्त्वाचा बदल करण्यात आला असून श्रेयस अय्यरच्या जागी लोकेश राहुलला संधी मिळाली आहे. तर जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले आहे. बाबर आझमच्या निर्णयाचे स्वागत करताना रोहित शर्माने सांगितले की, आम्ही देखील प्रथम फलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहोत. एकूणच पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असली तरी रोहितच्या म्हणण्यानुसार भारताच्या हिताचा निर्णय घेतला आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघ -
बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, शादाब खान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान, अलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हारीस रौफ.