India vs Pakistan Asia Cup 2023: भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) हे क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी संघ आहेत. जेव्हा जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने येतात, तेव्हा संपूर्ण जगाच्या नजरा त्यांच्याकडे असतात. हजारो लोक स्टेडियमवर पोहोचतात, रस्त्यावर शांतता असते आणि डोळे टीव्हीकडे लागलेले असतात. आता तब्बल 11 महिन्यांनंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहेत. पण यावेळी स्वरूप वेगळे आहे. गेल्या वर्षी दोन्ही संघ टी-२० मध्ये भिडले होते. यावेळी ते वन-डे मध्ये भिडणार आहेत. तसेच भारत आणि पाकिस्तान तब्बल ४ वर्षांनंतर वन डे सामन्यात एकमेकांसमोर येणार आहेत.
भारतावर पाकिस्तानचा वरचष्मा
वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा भारतावर वरचष्मा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला वनडे सामना 1978 मध्ये झाला होता. शेवटचा सामना 2019च्या विश्वचषकात झाला. या दरम्यान, दोन्ही संघांनी 132 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये भारताला 55 विजय मिळाले आहेत. पाकिस्तानने 73 सामने जिंकले. 4 सामन्यांचा निकाल लागला नाही.
आशिया कपमध्ये मात्र भारत पुढे
आशिया चषकाबाबत बोलायचे झाले तर येथे भारताचे पाकिस्तानवर वर्चस्व असल्याचे दिसते. 1984 मध्ये या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच सहभागी झाले होते. आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांमध्ये 13 सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने 7 सामने जिंकले आहेत तर पाकिस्तानने 5 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. या काळात अनेक जवळचे सामने झाले आहेत. भारताकडे एकूण 7 आशिया चषक ट्रॉफी आहेत, तर पाकिस्तानला केवळ दोन वेळा ही स्पर्धा जिंकता आली आहे.
भारत आणि पाकिस्तानचे शेवटचे ५ वनडे
- वर्ष परिणाम फरक स्पर्धा
- 2017 भारत जिंकला 124 धावा चॅम्पियन्स ट्रॉफी
- 2017 पाक जिंकला 180 धावा चॅम्पियन्स ट्रॉफी
- 2018 भारत जिंकला 8 विकेट्स आशिया कप
- 2018 भारत जिंकला 9 विकेट्स आशिया कप
- 2019 भारत जिंकला 89 धावा विश्वचषक
Web Title: Asia Cup 2023 India or Pakistan Who is the best See statistics Rohit Sharma vs Babar Azam
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.