Join us  

OUCH! पाकिस्तानी फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला, कुलदीप यादवच्या फिरकीने करिष्मा केला

Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत वर्चस्व मिळवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 10:33 PM

Open in App

Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत वर्चस्व मिळवले आहे. जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांचा स्पेल कौतुकास्पद होता आणि याचा फायदा अन्य गोलंदाजांनी उचलला. पाकिस्तानच्या एकेका फलंदाजांना त्यांनी माघारी पाठवले. कुलदीप यादवने दोन धक्के देत पाकिस्तानची अवस्था ५ बाद ९६ अशी केलीय. 

शार्दूल ठाकूरने भारी चेंडू टाकला, मोहम्मद रिझवानला 'पप्पू' बनवला, Video 

३५६ धावांच्या प्रत्युत्तरात  पाकिस्तानने ११ षटकांत ४४ धावांवर २ फलंदाज गमावले. जसप्रीत बुमराहने पाचव्या षटकात  सलामीवीर इमाम उल हकला ( ९) झेलबाद केले. हार्दिक पांड्याने त्याच्या पहिल्या आणि सामन्यातील ११व्या षटकात बाबर आजमचा ( १०) त्रिफळा उडवला. ११व्या षटकानंतर पाऊस आल्याने सामना थांबला होता. ९.१० वाजता मॅच पुन्हा सुरू झाली अन् शार्दूल ठाकूरने त्याच्या पहिल्याच षटकात मोहम्मद रिझवानला ( २) माघारी पाठवले. पाकिस्तानचे ३ फलंदाज ४७ धावांवर माघारी परतले.   

कुलदीप यादवच्या पहिल्या षटकात फखर बाद झाला असता, परंतु रोहितने स्लीपमध्ये त्याचा झेल टाकला. पण, कुलदीपने त्याच्या दुसऱ्या षटकात फखऱचा ( २७) त्रिफळा उडवला अन् पाकिस्तानला ७७ धावांवर चौथा धक्का दिला. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर सलमान आघा स्वीप मारायला गेला अन् चेंडू बॅटला लागून त्याच्या चेहऱ्यावर ( डोळ्याजवळ) आदळला.. रक्त वाहू लागल्याने डॉक्टरांनी मैदानावर त्वरीत धाव घेतली अन् प्राथमिक उपचार केले. हाच सलमान ( २३)  कुलदीपच्या चेंडूवरही स्वीप मारण्याच्या प्रयत्नात LBW झाला. पाकिस्तानचा निम्मा संघ ९६ धावांत तंबूत परतला. 

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानकुलदीप यादव