Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - विराट कोहली आणि लोकेश राहुल ( kL Rahul) यांनी पाकिस्तानी गोलंदाजांना रडकुंडीला आणले. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या लोकेशने संधीचं सोनं करत खणखणीत शतक झळकावले. पाठोपाठ विराटनेही शतकी खेळी करून पाकिस्तानची हालत खराब केली. विराट-लोकेशने आशिया चषक स्पर्धेतील भारतासाठी सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम नोदंवला.
हॅरीसच्या गैरहजेरीमुळे इफ्तिखारने ५ षटकं टाकली अन् भारताने ४६ धावा कुटल्या. सेट झालेल्या या दोघांनी अखेरच्या षटकांत स्टेडियम चौकार-षटकारांनी दणाणून सोडले. लोकेशने १०० चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह शतक पूर्ण केले. विराटनेही ८४ चेंडूंत वन डे तील ४७ वे शतक झळकावले, यासह त्याने वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १३००० धावांचा वर्ल्ड रेकॉर्डही नावावर केला. सचिन तेंडुलकरच्या नावावर हा विक्रम होता. विराट व लोकेश यांनी २३३ धावांची भागीदारी केली आणि भारताला ५० षटकांत ३५६ धावांपर्यंत पोहोचवले. विराट ९४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह १२२ धावांवर, तर लोकेश १०६ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह १११ धावांवर नाबाद राहिला.