IND vs PAK Live : पाऊस थांबला! षटकं कमी झाल्यास पाकिस्तान समोर किती असेल लक्ष्य?

Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - भारत-पाकिस्तान सामन्यात दुसऱ्या दिवशीही पावसाने खोडा घातला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 08:59 PM2023-09-11T20:59:08+5:302023-09-11T20:59:17+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - Covers are coming off, If the overs are reduced in the 2nd inns, then Pakistan's targets will be like below | IND vs PAK Live : पाऊस थांबला! षटकं कमी झाल्यास पाकिस्तान समोर किती असेल लक्ष्य?

IND vs PAK Live : पाऊस थांबला! षटकं कमी झाल्यास पाकिस्तान समोर किती असेल लक्ष्य?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - भारत-पाकिस्तान सामन्यात दुसऱ्या दिवशीही पावसाने खोडा घातला आहे. भारताने राखीव दिवशी फलंदाजी करताना २ बाद ३५६ धावांचा डोंगर उभा केला आणि प्रत्युत्तरात  पाकिस्तानने ११ षटकांत ४४ धावांवर २ फलंदाज गमावले आहेत. आता कोलंबोत पावसाने विश्रांती घेतली आहे आणि जर षटकं कमी झाल्यास पाकिस्तानसमोर सुधारित लक्ष्य काय असू शकते?

पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण जिंकेल? भारत-पाकिस्तान सामन्यातील महत्त्वाचे अपडेट्स


३५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानला जसप्रीत बुमराहने इंगा दाखवला. पाचव्या षटकात त्याने सलामीवीर इमाम उल हकला ( ९) झेलबाद केले. बाबर आजम व फखर जमान संयमी खेळ करताना दिसले. बाबरने ११व्या चेंडूवर चौकाराने खाते उघडले, पंरतु २४ व्या चेंडूवर हार्दिक पांड्याने त्याचा त्रिफळा उडवला. बाबर १० धावांवर माघारी परतला अन् पाकिस्तानला ४४ धावांवर दुसरा धक्का बसला. ११व्या षटकानंतर पाऊस आल्याने सामना थांबला. 


पाकिस्तानसमोर असे असू शकतं सुधारित लक्ष्य

  • २० षटकांत २०० धावा ( म्हणजे आता त्यांना ९ षटकांत कराव्या लागतील १५६ धावा)
  • २५ षटकांत २३७ धावा ( म्हणजे आता त्यांना १४ षटकांत कराव्या लागतील १९१ धावा)
  • ३० षटकांत २६७ धावा ( म्हणजे आता त्यांना १९ षटकांत कराव्या लागतील २२३ धावा)
  • ३५ षटकांत २९४ धावा ( म्हणजे आता त्यांना २४ षटकांत कराव्या लागतील २५० धावा) 

 

तत्पूर्वी,  रोहित शर्मा ( ७६) व शुबमन गिल ( ५८) यांनी काल १२१ धावांची भागीदारी करून मजबूत पाया रचला होता अन् आज विराट व लोकेश यांनी शतकं झळकावून त्यावर धावांचा पाऊस पाडला. पाकिस्तानविरुद्ध भारताने २ बाद ३५६ धावा चोपल्या.  विराट कोहलीने ९४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १२२ धावा केल्या आणि लोकेश राहुल १०६ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह १११ धावांवर नाबाद राहिला. 
 

Web Title: Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - Covers are coming off, If the overs are reduced in the 2nd inns, then Pakistan's targets will be like below

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.