पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण जिंकेल? भारत-पाकिस्तान सामन्यातील महत्त्वाचे अपडेट्स

Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - भारत-पाकिस्तान सामन्यात दुसऱ्या दिवशीही पावसाने खोडा घातला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 08:37 PM2023-09-11T20:37:31+5:302023-09-11T20:37:45+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - India and Pakistan will share 1 point each if no more play is possible tonight, Minimum 20 overs needed for DLS par score - Pakistan batted for 11 overs.  | पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण जिंकेल? भारत-पाकिस्तान सामन्यातील महत्त्वाचे अपडेट्स

पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण जिंकेल? भारत-पाकिस्तान सामन्यातील महत्त्वाचे अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - भारत-पाकिस्तान सामन्यात दुसऱ्या दिवशीही पावसाने खोडा घातला आहे. भारताने राखीव दिवशी फलंदाजी करताना २ बाद ३५६ धावांचा डोंगर उभा केला आणि प्रत्युत्तरात  पाकिस्तानने ४४ धावांवर २ फलंदाज गमावले आहेत. पावसामुळे खेळ थांबला आहे आणि जर सामना सुरूच न झाल्यास निकाल काय लागेल?

 Video : हार्दिक पांड्याने उडवला बाबर आजमचा 'दांडा'! पाकिस्तानचा पराभव पक्का यंदा


भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा कचरा केला. रोहित शर्मा ( ७६) व शुबमन गिल ( ५८) यांनी काल १२१ धावांची भागीदारी करून मजबूत पाया रचला होता अन् आज विराट व लोकेश यांनी शतकं झळकावून त्यावर धावांचा पाऊस पाडला. पाकिस्तानविरुद्ध भारताने २ बाद ३५६ धावा चोपल्या. पाकिस्तानविरुद्घ भारताने वन डेतील सर्वोत्तम धावसंख्या आज उभी केली. २००५ मध्ये विशाखापट्टणम येथे भारताने ९ बाद ३५६ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने ९४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १२२ धावा केल्या आणि लोकेश राहुल १०६ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह १११ धावांवर नाबाद राहिला. 

Virat Kohli ने १९ वर्षांपूर्वीचा जुळवून आणला योगायोग; KL Rahul सोबत मोडले १० मोठे विक्रम


प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानला जसप्रीत बुमराहने इंगा दाखवला. पाचव्या षटकात त्याने सलामीवीर इमाम उल हकला ( ९) झेलबाद केले. बाबर आजम व फखर जमान संयमी खेळ करताना दिसले. बाबरने ११व्या चेंडूवर चौकाराने खाते उघडले, पंरतु २४ व्या चेंडूवर हार्दिक पांड्याने त्याचा त्रिफळा उडवला. बाबर १० धावांवर माघारी परतला अन् पाकिस्तानला ४४ धावांवर दुसरा धक्का बसला. ११व्या षटकानंतर पाऊस आल्याने सामना थांबला. 

Image
पण, पावसामुळे सामना पुढे सुरू न झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले जातील. कारण DLS नियमासाठी पाकिस्तानने किमान २० षटकं खेळायला हवी होती, परंतु ११व्या षटकानंतर पाऊस सुरू झालाय. जर पाऊस थांबला अन् षटकं कमी झाली तर पाकिस्तानला २० षटकांत २०० किंवा २५ षटकांत २३७ किंवा ३० षटकांत २६७ धावांचे लक्ष्य पार करावे लागेल.    

Web Title: Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - India and Pakistan will share 1 point each if no more play is possible tonight, Minimum 20 overs needed for DLS par score - Pakistan batted for 11 overs. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.