विराट, बाबर अन् दोन्ही संघाचे खेळाडू मैदानावर पोहोचले; कोलंबोहून महत्त्वाचे अपडेट्स आले 

दोन्ही संघ कोलंबो येथे दाखल झाले आहेत आणि पाऊस थांबण्याची प्रतीक्षा पाहत आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 03:08 PM2023-09-11T15:08:23+5:302023-09-11T15:13:52+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - India Vs Pakistan Day 2 start delayed due to rain, Both team players reach in to stadium | विराट, बाबर अन् दोन्ही संघाचे खेळाडू मैदानावर पोहोचले; कोलंबोहून महत्त्वाचे अपडेट्स आले 

विराट, बाबर अन् दोन्ही संघाचे खेळाडू मैदानावर पोहोचले; कोलंबोहून महत्त्वाचे अपडेट्स आले 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - भारत-पाकिस्तान यांच्यातला आशिया चषक २०२३ स्पर्धेतील राखीव दिवसाचा खेळही पावसामुळे उशीरा सुरू होणार असे चित्र दिसतेय.. कोलंबो येथे जोरदार पाऊस सुरू आहे आणि संपूर्ण मैदान अजूनही झाकून ठेवले गेले आहे. पावसाने सकाळपासून लपंडाव खेळ सुरू केला आहे. दोन्ही संघ कोलंबो येथे दाखल झाले आहेत आणि पाऊस थांबण्याची प्रतीक्षा पाहत आहेत. 

डोकेफोडी! IND vs PAK सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारत फायनलमध्ये कसा पोहोचणार?

Image
फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर बाबर आजमने काल नाणेफेक जिंकून भारताला आयते कोलीत दिले. रोहित आणि शुबमन यांनी  पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची विक्रमी भागीदारी केली. रोहित ५६ धावांवर, तर  शुबमनही ५८ धावांवर बाद झाला. दोन्ही सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताचा डाव थोडासा मंदावला. २४.१ षटकानंतर २ बाद १४२ धावांवर भारताचा खेळ थांबवावा लागला. रात्री ९ वाजता ३४-३४ षटकांची मॅच सुरू होईल असा निर्णय झालाच होता, पण पावसाने पुन्हा एन्ट्री घेतली अन् मॅच स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला.


IND vs PAK यांच्यात आज राखीव दिवशीही पाऊस सुरूच आहे. दोन्ही संघाचे खेळाडू डग आऊटमध्ये बसून पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. काल ७० टक्के स्टेडियम रिकामी होते आणि आज हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच प्रेक्षक दिसले. दुपारी २ वाजता पाऊस थांबला होता अन् २.३० वाजता कव्हर्स हटवण्याचं कामही सुरू झालं होतं. पण, २.५७ वाजता पुन्हा पाऊस सुरू झाला अन् कव्हर्स टाकण्यात आले. 

Web Title: Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - India Vs Pakistan Day 2 start delayed due to rain, Both team players reach in to stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.