Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या लोकेश राहुलने ( KL Rahul) मिळालेल्या संधीचं सोनं केलं. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी लोकेशने केलेली फलंदाजी पाहून चाहते आनंदीत झाले. रोहित शर्मा व शुबमन गिल यांच्यानंतर लोकेश व विराट कोहली यांनी दीड शतकी भागीदारी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांनी धुलाई केली.
Video : KL Rahul ने संधीचं सोनं केलं! त्याचा Six नंतर रोहित, विराट यांची रिॲक्शन Viral
विराटनेही ५५ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या आघाडीच्या चारही फलंदाजांनी फिफ्टी झळकावण्याची ही चौथी वेळ ठरली. शाहीनच्या गोलंदाजीवर विराटचा झेल हवेत उडाला होता, परंतु नसीम चेंडूपर्यंत पोहोचलाच नाही. विराटने इफ्तिखारचा पुढच्या षटकात खणखणीत षटकार खेचला. उत्तुंग फटक्यांसोबतच विराट-लोकेश २-२ धावाही चतुराईने चोरत होते. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाज हतबल झाले. हॅरीसच्या गैरहजेरीमुळे इफ्तिखारने ५ षटकं टाकली अन् भारताने ४६ धावा कुटल्या. सेट झालेल्या या दोघांनी अखेरच्या षटकांत स्टेडियम चौकार-षटकारांनी दणाणून सोडले. लोकेशने १०० चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह शतक पूर्ण केले.