Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - भारत-पाकिस्तान यांच्यातला आशिया चषक २०२३ स्पर्धेतील राखीव दिवसाचा खेळही पावसामुळे उशीरा सुरू होतोय. कोलंबो येथे जोरदार पाऊस झाल्याने संपूर्ण मैदान झाकून ठेवले गेले होते. दोन्ही संघ कोलंबो येथे दाखल झाले आहेत आणि पाऊस थांबण्याची प्रतीक्षा पाहत होते. अखेर ४ वाजता सूर्याची कृपा झाली अन् मैदानावरील कव्हर्स काढले गेले.
IND vs PAK यांच्यात आज राखीव दिवशीही पाऊस सुरूच होता. दोन्ही संघाचे खेळाडू डग आऊटमध्ये बसून पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. दुपारी २ वाजता पाऊस थांबला होता अन् २.३० वाजता कव्हर्स हटवण्याचं कामही सुरू झालं होतं. पण, २.५७ वाजता पुन्हा पाऊस सुरू झाला अन् कव्हर्स टाकण्यात आले. पण, अखेर पावसाने विश्रांती घेतली अन् कव्हर्स काढले गेले. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि पाकिस्तानचे काही खेळाडू खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी मैदानावर आले. ४.२० वाजता मैदानाची पाहणी करण्यात आली. हॅलोजन व पंख्यांनी खेळपट्टी सुकवण्यात आली. ४.४० वाजता मॅच सुरू होणार आहे आणि पूर्ण ५०-५० षटकांचा सामना होईल.
दरम्यान, काल रोहित आणि शुबमन यांनी पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची विक्रमी भागीदारी केली. रोहित ५६ धावांवर, तर शुबमनही ५८ धावांवर बाद झाला. दोन्ही सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताचा डाव थोडासा मंदावला. २४.१ षटकानंतर २ बाद १४२ धावांवर भारताचा खेळ थांबवावा लागला होता. विराट कोहली व लोकेश राहुल नाबाद आहेत.