Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत वर्चस्व मिळवलेले दिसतेय.. फलंदाजांच्या दमदार कामगिरीला गोलंदाजांनी तितकीच साजेशी साथ दिली. जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांचा स्पेल कौतुकास्पद होता. त्यामुळे पाकिस्तानवर दडपण निर्माण केले. बुमराहने विकेटची बोहनी केल्यानंतर हार्दिक पांड्याने त्याच्या पहिल्या षटकात विकेट घेतली. पावसाच्या खेळानंतर मॅच पुन्हा सुरू झाली आणि शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) त्याच्या पहिल्या षटकात विकेट मिळवली.
१३००० धावा ते सर्वोत्तम भागीदारी; विराट कोहली-KL Rahul जोडीने मोडले विक्रम लै भारी
भारत-पाकिस्तान सामन्यात दुसऱ्या दिवशीही पावसाने खोडा घातला होता. भारताने राखीव दिवशी फलंदाजी करताना २ बाद ३५६ धावांचा डोंगर उभा केला आणि प्रत्युत्तरात पाकिस्तानने ११ षटकांत ४४ धावांवर २ फलंदाज गमावले आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानला जसप्रीत बुमराहने इंगा दाखवला. पाचव्या षटकात त्याने सलामीवीर इमाम उल हकला ( ९) झेलबाद केले. हार्दिक पांड्याने त्याच्या पहिल्या आणि सामन्यातील ११व्या षटकात बाबर आजमचा ( १०) त्रिफळा उडवला. ११व्या षटकानंतर पाऊस आल्याने सामना थांबला होता. ९.१० वाजता मॅच पुन्हा सुरू झाली अन् शार्दूल ठाकूरने त्याच्या पहिल्याच षटकात मोहम्मद रिझवानला ( २) माघारी पाठवले. पाकिस्तानचे ३ फलंदाज ४७ धावांवर माघारी परतले.
Web Title: Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - Shardul Thakur strikes in the first over after the resumption; Mohammad Rizwan edges one to KL Rahul - Pakistan 47 for 3, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.