Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - भारत-पाकिस्तान यांच्यातला आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सुपर ४ मधील सामना अखेर सुरू झाला. रोहित शर्मा व शुबमन गिल यांच्या फटकेबाजीनंतर पावसाची एन्ट्री झाली होती. पण, आज लोकेश राहुल ( KL Rahul) व विराट कोहली यांची जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांची हालत खराब केली.
काल रोहित ( ७६) आणि शुबमन ( ५८) यांनी पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची विक्रमी भागीदारी केली. दोन्ही सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताचा डाव थोडासा मंदावला होता. पावसामुळे २४.१ षटकानंतर २ बाद १४२ धावांवर भारताचा खेळ थांबवावा लागला होता. आजही पावसाने सामन्यावर संकट निर्माण केले होते. पण, पावसाने विश्रांती घेतली आणि ४.२० वाजता मैदानाची पाहणी करण्यात आली. ४.४० वाजता मॅच सुरू झाली. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी राखीव दिवशी खेळाला सुरुवात केली. पण, हॅरीस रौफ दुखापतीमुळे आज गोलंदाजी करणार नसल्याची बातमी पाकिस्तानच्या ताफ्यातून आली. नसीम शाहच्या गोलंदाजीवर विराटची विकेट मिळवण्यासाठी पाकिस्तानने आणखी एक DRS गमावला.
विराट कोहली व लोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. त्यानंतर दोघांनी फटकेबाजी सुरू केली. इफ्तिखार अहमदच्या खराब गोलंदाजीचा राहुलने पुरेपूर फायदा उचलला. लोकेशने ६० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर शादाब खानला धुतले. पुढे येऊन त्याने मनगटाच्या जोरावर मारलेला षटकार अप्रतिम होता. यासह त्याने विराटसह शतकी भागीदारी पूर्ण केली. विराटनेही ५५ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या आघाडीच्या चारही फलंदाजांनी फिफ्टी झळकावण्याची ही चौथी वेळ ठरली.
Web Title: Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - The reaction of Rohit Sharma and Virat Kohli on KL Rahul's six, What a smash, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.