Join us  

Video : हार्दिक पांड्याने उडवला बाबर आजमचा 'दांडा'! पाकिस्तानचा पराभव पक्का यंदा

Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - भारताच्या ३५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने ४३ धावांवर २ फलंदाज गमावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 8:17 PM

Open in App

Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - भारताच्या ३५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने ४३ धावांवर २ फलंदाज गमावले आहे. जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांच्या अप्रतिम स्पेलनंतर हार्दिक पांड्याने भारताला मोठी विकेट मिळवून दिली. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याचा दांडा उडवला. पावसामुळे खेळ थांबला आहे.

Virat Kohli ने १९ वर्षांपूर्वीचा जुळवून आणला योगायोग; KL Rahul सोबत मोडले १० मोठे विक्रम

भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा कचरा केला. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी काल १२१ धावांची भागीदारी करून मजबूत पाया रचला होता अन् आज विराट व लोकेश यांनी शतकं झळकावून त्यावर धावांचा पाऊस पाडला. पाकिस्तानविरुद्ध भारताने २ बाद ३५६ धावा चोपल्या. पाकिस्तानविरुद्घ भारताने वन डेतील सर्वोत्तम धावसंख्या आज उभी केली. २००५ मध्ये विशाखापट्टणम येथे भारताने ९ बाद ३५६ धावा केल्या होत्या. त्याआधी २००४ मध्ये कराची येथे ७ बाद ३४९ आणि मँचेस्टर येथे २०१९ मध्ये ५ बाद ३३६ धावा केल्या होत्या.  

विराट कोहलीने ९४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १२२ धावा केल्या आणि लोकेश राहुल १०६ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह १११ धावांवर नाबाद राहिला. रोहित शर्मा ( ७६) व शुबमन गिल ( ५८) यांनी अर्धशतकी खेळी केली. वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी ५०+ धावा करण्याची ही चौथी वेळ ठरली. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानला जसप्रीत बुमराहने इंगा दाखवला.

पाचव्या षटकात त्याने सलामीवीर इमाम उल हकला ( ९) झेलबाद केले. बाबर आजम व फखर जमान संयमी खेळ करताना दिसले. बाबरने ११व्या चेंडूवर चौकाराने खाते उघडले, पंरतु २४ व्या चेंडूवर हार्दिक पांड्याने त्याचा त्रिफळा उडवला. बाबर १० धावांवर माघारी परतला अन् पाकिस्तानला ४३ धावांवर दुसरा धक्का बसला. ११व्या षटकानंतर पाऊस आल्याने सामना थांबला. 

 

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानबाबर आजमहार्दिक पांड्या